मुंबई - Salman khan :सलमान खान आणि कतरिना कैफची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांच्या मनाला भिडली आहे. जरी सलमान खान कतरिना कैफसोबत रील लाइफमध्ये रोमान्स करताना दिसत असला तरी कतरिनाचा खऱ्या आयुष्यातील हिरो विकी कौशल आहे. दरम्यान नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'टायगर 3' चित्रपटाच्या सक्सेस पार्टीतच्या कार्यक्रमात सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी एकत्र दिसले होते. यावेळी या स्टार्सनं खूप मस्ती केली. याशिवाय त्यांनी अनेक चाहत्यांचे मनोरंजन देखील केले. यावेळी सलमान, इमरान आणि कतरिना कैफ यांनी चाहत्यांशी संवाद साधला. एका चाहत्यानं विकी कौशलचं नाव या कार्यक्रमात घेतले. त्यानंतर सलमान खाननं विकी म्हटल्यानंतर कतरिना कैफचा चेहरा अचानक लाल झाला.
सलमान खाननं विकी कौशलवर केलं वक्तव्य: एका व्हिडिओमध्ये सलमान खान एका चाहत्याला म्हटलं की, ''हा पुष्पगुच्छ माझ्यासाठी आणला आहे, पण मला वाटले की हा कतरिनासाठी आणला असणार, विकी हा उंच आणि दणकट आहे, तो तुम्हाला खूप मारेल'', असं त्यानं मस्करी करत चाहत्यांना सांगितलं. या कार्यक्रमात सलमान-कतरिनानं ''लेके प्रभु का नाम'' या गाण्यावर डान्स केला. याशिवाय भाईजाननं कतरिनाच्या गळ्यात टायगरचा मफलरही घातला. चाहत्यांनी खचाखच भरलेल्या या कार्यक्रमात सलमान खानचा एक चाहती जोरात म्हणाली की, सलमान भाईसमोर कोणी बोलू शकेल का? यावर सलमान खान म्हणाला 'तू स्वतःच तर बोलत आहेस आणि वर तू म्हणतेस की सलमान भाई समोर कोणी बोलू शकते का?' त्यानंतर अनेकजण यावर हसले.