मुंबई : सध्या सनी देओलचा अॅक्शन ड्रामा चित्रपट 'गदर २' चित्रपटगृहांवर राज्य करत आहे. दरम्यान आता एक बातमी समोर आली आहे. सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल आणि पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा यांची जोडी राजश्री प्रॉडक्शनच्या 'दोनो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'दोनो' चित्रपटाच्या टीझरनंतर निर्मात्यांनी नुकताच चित्रपटाचा पहिला टायटल ट्रॅक रिलीज केला आहे.सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन यांनी हा ट्रॅक आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. सलमान आणि भाग्यश्री या दोघांनीही आपल्या करिअरची सुरुवात 'मैने प्यार किया' मधून केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि तेव्हापासून सलमान चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.
'दोनो' रोमँटिक ट्रॅक 'हम दोनो' रिलीज :चित्रपटामधील सनी देओलच्या 'गदर २'चे कौतुक केल्यानंतर, सलमान खानने अलीकडेच राजवीरच्या 'दोनो' या डेब्यू चित्रपटाचा पहिला रोमँटिक ट्रॅक त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. याशिवाय भाग्यश्री देखील तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'दोनो' चित्रपटामधील गाणे शेअर केले आहे. राजश्री प्रॉडक्शन अंतर्गत राजवीर देओलच्या 'दोनो' या डेब्यू चित्रपटातील पहिल्या गाण्याचा व्हिडिओ शेअर करताना,कॅप्शनमध्ये लिहिल्या गेले, 'हम दोनों आप सब के लिए... ये दोनों' प्रतिभावान, आणि उगवते स्टार्स राजवीर आणि पलोमाला. 'आमच्याकडून शुभेच्छा'.असे त्यांनी या पोस्टवर लिहले आहे.