मुंबई :बिग बॉस ओटीटी २ शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा शो सलमान खान होस्ट करत असून या शोमध्ये सलमान वेळोवेळी स्पर्धकांना फटकारत असतो. मात्र आता थोडी परिस्थिती बदलेली आहे. यावेळी सलमान खानला प्रेक्षकांनी फटकारले आहे. प्रेक्षकांनी आता सलमानला निशाण्यावर पकडले आहे. बिग बॉस ओटीटीच्या सेटवर सलमान हा हातात सिगारेट धरताना दिसला होता. आता सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, सलमान खान होस्टिंगदरम्यान सिगारेट ओढत होता. सलमान खानबद्दल सोशल मीडियावर आता बरीच चर्चा होत आहे.
सलमान खानला युजर्सने मारले टोमणे :सलमान खानने गेल्या वीकेंडच्या वाॉरमध्ये चेक्स शर्टवर ब्लॅक जीन्स परिधान केली होती. यावेळी तो त्याच्याच स्वॅगमध्ये दिसत होता. दरम्यान शोमधील व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, होस्टिंग दरम्यान सलमान खान डाव्या हातात सिगारेट घेऊन उभा आहे. तसेच आता सलमानचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. बरेच चाहते त्याला वाईट वर्तणूक करत असल्याचे म्हणत आहेत. सध्या सोशल मीडियावर युजर्स सलमान खानला टोमणे मारत आहेत. शोच्या एडिटिंगच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.