मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या चाहत्यांना होळी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. एक विलक्षण किंवा नाट्यमय फोटो शेअर करत त्याने चाहत्यांशी संवाद साधलाय. इंस्टाग्रामवर दबंग अभिनेता सलमानने स्वतःचा एक लो एंगल फोटो शेअर केला आहे. कोणताही बडेजाव न करता त्याने एक साधा प्रोफाइल ठेवला आहे. पनवेल येथील सलमानच्या फार्म हाऊस बाहेरचा हा फोटो आहे.
सलमान तपकिरी रंगाच्या टोपीसह राखाडी रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला दिसत आहे, होळीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा असे त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लहिलंय. सलमानने हा फोटो शेअर करताच त्याचा कमेंट सेक्शन रंगबिरंगी शुभेच्छांचा संदेशांनी अक्षरशः भरुन गेले आहे. काहींनी त्याच्या लूकची चर्चा केली आहे, तर कोणी त्याच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने भाष्य करत आहे. त्याला होळीच्या शुभेच्छा देताना चाहते थकत नाहीत. भाईजानला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे.
बॉलिवूडमध्ये होळीच्या सणाला खूप महत्त्व आहे. अनेक सिलेब्रिटी आजचा दिवस अत्यंत जल्लोषात साजरा करत असतात. कोविडमुळे गेली ३ वर्षे या सणापासून बॉलिवूडकर वंचित राहिले होते. आता पुन्हा एकदा तोच जल्लोष कलाकारांच्यामध्ये दिसत आहे. बॉलिवूड स्टार्सची सोशल मीडिया अकाऊंट्स पाहिले तर सर्वच जण होळी निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. प्रत्येकाला हा दिवल रंगबिरंगी बनवायचा आहे.
वर्क फ्रंटवर, सलमान खान सध्या त्याच्या आगामी अॅक्शन थ्रिलर 'टायगर 3' चे चित्रीकरण करत आहे. टायगर फ्रँचायझीचा तिसरा भाग असलेल्या 'टायगर 3' चे दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहेत. आगामी अॅक्शन चित्रपटात सलमान खान आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. त्याशिवाय सलमान आगामी कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' मध्ये झळकणार आहे, ज्यामध्ये तो पूजा हेगडेसोबत सहकलाकार म्हणून काम करत आहे. 'किसी का भाई किसी की जान'च्या निर्मात्यांनी नुकतेच चित्रपटाचे दुसरे गाणे 'बिल्ली बिल्ली' रिलीज केले आहे. हा चित्रपट 2023 च्या ईदला देशासह जगभर थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
हेही वाचा -Amitabh Bachchan Holi Wishes : अमिताभ बच्चन यांनी होळीच्या शुभेच्छांसह दिली आरोग्याची अपडेट