मुंबई - Salman Khan : अभिनेता सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळं नेहमीचं चर्चेत असतो. मात्र, त्याला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून आणखी धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी मंगळवारी सलमान खानला दिलेल्या सुरक्षेचा आढावा घेतला असून त्याला सतर्क राहण्यास सांगितलं आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वीच सलमानला वाय-प्लस सुरक्षा दिली आहे. सलमान खानला लॉरेन्सच्या कथित फेसबुक पोस्टद्वारे धमकी देण्यात आली आहे. दुसरीकडं रविवारी बिश्नोईनं फेसबुक पोस्टमध्ये गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर अनेक सेलेब्रिटी घाबरले होते.
सलमान खानला धमकी : सलमान खानचा नुकताच 'टायगर 3' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जगभरात 400 कोटीहून अधिक कमाई केली. आता हा चित्रपट देशांतर्गत 300 कोटीचं लक्ष्य गाठण्याच्या जवळपास आहे. या चित्रपटानं देशांतर्गत 276.25 कोटीचं एकूण कलेक्शन केलं आहे. दरम्यान सलमान अशा धमक्या मिळाल्यानंतर त्याच्या कामावरदेखील परिणाम होत आहे.
पंजाब गायकाला सलमानच्या नावानं धमकी-पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल उद्देशून सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते की, 'तूझा सलमान खान भाई आहेस ना? त्याला सांग आता तुला वाचव. सलमान खानला हा एक संदेश माझा दे. तुला माझ्यापासून कोणी वाचवू शकणार नाही. तू सिद्धू मूसावालाच्या मृत्यूवर खूप जास्त ओव्हरअॅक्ट केलं होतं. तो कोणत्या गुन्हेगारी लोकांच्या संपर्कात होता हे तुला माहीत आहे. जोपर्यंत विकी मिड्डूखेडा जिवंत होता, तोपर्यंत तू त्याच्या मागे-पुढे फिरत होता. तू आता रडारवर आला आहे'. याप्रकारे धमकी देण्यात आली होती.
काळवीट प्रकरण :सलमान खान काळवीट शिकार प्रकरणात जेलमधून बाहेर आल्यानंतर अनेकदा त्याला धमक्या येत होत्या. 1998 रोजी घडलेल्या या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 51 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1998 मध्ये "हम साथ साथ हैं" च्या चित्रीकरणादरम्यान जोधपूरमध्ये दोन काळवीटांची हत्या केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. जोधपूर न्यायालयानं सलमानची जामिनावर सुटका केली. काळवीट शिकार प्रकरणात सलमान खाननं शस्त्रास्त्र कायद्याशी संबंधित बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा दावा करणारी याचिका जोधपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फेटाळून लावली होती.
हेही वाचा :
- 'अॅनिमल' विरुद्ध 'सॅम बहादूर': अॅडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत रणबीर कपूरच्या चित्रपटानं मारली बाजी
- 'छपाक'च्या अपयशासाठी मेघना गुलजारनं दीपिका पदुकोणला धरलं जबाबदार
- लग्नाआधी रणदीप हुडा आणि गर्लफ्रेंडसह घेतलं इम्फाळ येथील मंदिरात दर्शन