महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

डेंग्यूतून बरा झाल्यानंतर लोकांसमोर पहिल्यांदाच आला सलमान खान - आयुष शर्मा वाढदिवस पार्टीत सलमान

डेंग्यूमधून बरा झाल्यानंतर सलमान खान पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या हजर झाला आहे. सलमानने मंगळवारी रात्री त्याचा मेहुणा आयुष शर्माच्या वाढदिवसाला हजेरी लावली. सलमानच्या अलीकडील आउटिंगमुळे त्याच्या चाहत्यांसाठी दिलासा मिळाला आहे. त्याची तब्येत तंदुरुस्त झालेली पाहून त्यांना आनंद आणि समाधान मिळाले आहे.

सलमान खान
सलमान खान

By

Published : Oct 26, 2022, 12:54 PM IST

मुंबई- सलमान खान डेंग्यूमधून बरा झाल्याचे दिसत आहे. मंगळवारी, सलमानने त्याचा मेव्हणा आयुष शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीत भव्य प्रवेश केला आणि नेहमीप्रमाणे, त्याच्या फॉर्ममध्ये त्याला परत पाहून चाहते आनंदित झाले.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असलेल्या बातम्यांनुसार, सलमानला गेल्या आठवड्यात डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते. गेल्या आठवड्यात, एका वृत्तवाहिनीच्या सूत्राने सांगितले होते की सलमानची तब्येत बरी नाही आणि त्याने बिग बॉसच्या होस्टिंगमधून थोडा ब्रेक घेतला आहे. तथापि, स्त्रोताने त्याच्या डेंग्यूच्या निदानाची पुष्टी केली नव्हती.

सलमानच्या अलीकडील आउटिंगमुळे त्याच्या चाहत्यांसाठी दिलासा मिळाला आहे. त्याची तब्येत तंदुरुस्त झालेली पाहून त्यांना आनंद आणि समाधान मिळाले आहे. चित्रपट निर्माता करण जोहरने बिग बॉसच्या 16व्या सीझनचे सूत्रसंचालन काही काळासाठी केले आहे. बिग बॉसशिवाय सलमान त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या शूटिंगमध्येही व्यग्र होता.

किसी का भाई किसी की जान 2023 च्या ईदला रिलीज होणार आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित अॅक्शन-पॅक एंटरटेनर म्हणून या चित्रपटाबद्दलची चर्चा आहे. त्यात पूजा हेगडे आणि व्यंकटेश दग्गुबती यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. शहनाज गिल आणि पलक तिवारी देखील या प्रकल्पाचा एक भाग आहेत.

या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्सने केली आहे आणि सलमान खानच्या चित्रपटाकडून अपेक्षित असलेले सर्व घटक - अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा, प्रणय आणि भावना या चित्रपटात असतील. अलीकडेच सलमानने असेही जाहीर केले की त्याचा कॅटरिना कैफसोबतचा टायगर 3 हा चित्रपट 2023 च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -Bollywood Actress : दिवाळीत अशा नटल्या बॉलिवूडच्या नव्या जुन्या अभिनेत्री

ABOUT THE AUTHOR

...view details