मुंबई - अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक शहनाज गिल सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाळी'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सलमानने शहनाजला तिच्या इच्छेनुसार फी निवडण्याची परवानगी दिली आहे.
शहनाजला तिच्या इच्छेनुसार फी निवडण्याची परवानगी सलमान खानने दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. असे मानले जाते की शहनाजबद्दलच्या प्रेमामुळे सलमानने तिला चित्रपटात काम करण्यासाठी संपर्क साधला आणि तिला पाहिजे ती रक्कम आकारण्याची परवानगी देखील दिली. बिग बॉसच्या दिवसांमध्ये शहनाजच्या निरागसपणाने सलमानला नेहमीच आकर्षित केले होते.
होणाऱ्या 'कभी ईद कभी दिवाळी' या सलमानच्या चित्रपटात शहनाजची जोडी आयुष शर्मा सोबत असणार आह. यात ती एका निष्पाप आणि असुरक्षित मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. कभी ईद कभी दिवाळीमध्ये सलमान खानच्या भावांची भूमिका करणाऱ्या आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल यांच्यासोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत असेल.
राघव जुयाल या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये सामील झाल्याचाही अंदाज आहे. शहनाज गिल अलीकडेच होंसला रख या पंजाबी चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत दिसली आहे30 डिसेंबर 2022 रोजी रिलीज होणाऱ्या 'कभी ईद कभी दिवाळी'मधून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
हेही वाचा -'feels Like Impending Doom': आमिर खानची मुलगी आयरा खान होती डिप्रेशनमध्ये