मुंबई - Farrey Screening : सलमान खानची भाची अलीझेह अग्निहोत्री 'फर्रे'मधून डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. सौमेंद्र पाधी दिग्दर्शित हा चित्रपट 24 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन केले होते, ज्यामध्ये सलमान खान, त्याची सावत्र आई हेलन, बहिणी अलविरा आणि अर्पिता, कियारा अडवाणी, कतरिना कैफ, सनी देओल, करण देओल, जेनेलिया देशमुख यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दरम्यान या खास प्रसंगाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या खास कार्यक्रमाला सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी आणि निर्माती गौरी खान देखील आली होती.
'फर्रे' चित्रपटाचं स्क्रिनिंग : 'फर्रे'च्या स्क्रिनिंगला गौरी खाननं काळ्या पोशाखासोबत पिवळ्या रंगाचा सुंदर ब्लेझर घातला होता. स्टार किड अनन्या पांडे देखील जांभळा रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. या कार्यक्रमात तिनं रेड कार्पेटवर पापाराझीला फोटोसाठी पोझ दिली. याशिवाय कतरिना कैफनं सलमानच्या भाचीच्या डेब्यू चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला लाल रंगाचा वन शोल्डर ड्रेस परिधान केला होता. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं हिल्स घातली होती. यावर तिनं न्यूड मेकअप केला होता. याशिवाय तिनं केस मोकळी सोडली होती.