मुंबई -Diwali party : देशभरात रविवारी दिवाळी सण हा साजरा होणार आहे. या महोत्सवाच्या जल्लोषाला आतापासूनच सुरुवात झाली आहे. नुकतीच मनीष मल्होत्रानं आपल्या घरी स्टार्ससोबत दिवाळी साजरी केली. दरम्यान बॉलिवूडची दुसरी दिवाळी पार्टी मंगळवारी पार पडली. या पार्टीचे आयोजन चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांनी केले होते. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. रमेश तौरानी यांच्या पार्टीत सलमान खान, कतरिना कैफ, रितेश देशमुख, जेनेलिया या कलाकारांचा समावेश होता. दरम्यान या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पार्टीत लावली स्टार्सनं हजेरी : पार्टीमध्ये सलमान खान पारंपारिक पोशाखात आला होता. त्यानं पिवळा शर्ट आणि भुरकट रंगाचा जीन्स घातला होता. एका व्हिडिओमध्ये सलमान पापाराझीला पोझ देत असताना खूप आनंदी दिसत आहे. दरम्यान, कतरिना कैफ तपकिरी पारंपारिक पोशाखात कार्यक्रमात पोहोचली. यावर तिनं लाईट मेकअप केला होता. याशिवाय तिनं कमीतकमी दागिने घातले होते, या लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं टिकली लावली होती. यावर तिनं तिचे केस मोकळे सोडले होते. यावेळी ती सुंदर दिसत होती.
'टायगर 3' चित्रपट होणार दिवाळीत प्रदर्शित : या पार्टीत सिद्धार्थ मल्होत्रा काळ्या रंगाचा एथनिक एम्ब्रॉयडरी बनियानसह पोशाखात आला होता. यावेळी वरुण धवननं निळा रंगाचा कुर्ता परिधान केला होता. या पार्टीमध्ये जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख हे पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसले. नुसरत भरुच्चानं यावेळी गुलाबी आणि नारंगी लेहेंगा परिधान केला होता. याशिवाय शनाया कपूर आणि तिचे आई-वडील महीप कपूर, संजय कपूर यांच्यासह या कार्यक्रमाला हजर होती. या पार्टीमध्ये अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, सोहा अली खान, कुणाल खेमू, पूजा हेगडे, मनीष पॉल, पुनित मल्होत्रा, इशान खट्टर, हुमा कुरेशी, करिश्मा तन्ना, रोहित सराफ, पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा उपस्थित होते. तसेच निर्माते आनंद पंडित पार्टीमध्ये पत्नी रूपा पंडितसोबत पोहोचले होते. कतरिना आणि सलमानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'टायगर 3' या वर्षीच्या दिवाळीच्या दिवशी 12 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेनं पाहत आहे
हेही वाचा :
- Vishal Gurnani Diwali Bash : एक्स रोहमन शॉलसोबत सुष्मिता सेनच्या आगमनानं चाहत्यांच्या नजरा विस्फारल्या
- Student Of The Year Reunion: दिवाळी पार्टीत सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवनचं पुनर्मिलन
- Honey Singh Divorce : हनी सिंगचा १२ वर्ष जुना संसार तुटला, पत्नी शालिनी तलवारशी घटस्फोट