मुंबई - Salman Khan Brother Birthday:हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सलमान खानचा भाऊ-अभिनेता सोहेल खानचा 53 वा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी सलमान खानचं संपूर्ण कुटुंब एकत्र जमले होतं. यावेळी सलीम खान, सलमा खान, हेलन, अर्पिता खान आणि आयुष शर्मा अलविरा खानसह, अतुल अग्निहोत्री आणि त्यांची मुलगी अलिझेह अग्निहोत्री आणि काही जवळचे मित्र रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेलेनिया या वाढदिवसाच्या पार्टीत हजर होते. यावेळी सर्वजण कुटुंबसह आनंदानं फोटो काढताना दिसले. दरम्यान यावेळी पापाराझीनं भाईजानच्या कुटुंबाचे व्हिडिओ आणि फोटो काढले.
भाईजान झाला पॅप्सवर नाराज : पापाराझीनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर सलमान खानच्या कुटुंबाचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये भाईजान पॅप्सवर रागावलेला दिसत आहे. अनेक फोटोग्राफनं फोटो काढण्यासाठी सलमानच्या कारला घेरल, त्यानंतर सलमान हा पापाराझींवर नाराज झाला. आता भाईजानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोहेल खानचा वाढदिवस साजरा करून हॉटेलमधून बाहेर पडत असताना सलमान खान आपल्या आईचा हात धरून कारच्या दिशेने जाताना कॅमेऱ्यात कैद झाला. काही दिवसांपूर्वीच सलमानची आई सलमा खाननं तिचा 81 वा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी त्यांची मुलगी अर्पिता खान आणि जावई अतुल अग्निहोत्री यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.