मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरशी बऱ्याच काळापासून जोडला गेला आहे. अनेक समारंभात आणि पार्ट्यामध्ये ते एकत्र दिसले आहेत. शुक्रवारी, अबुधाबी येथील इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स (IIFA) मध्ये युलिया वंतूरने तिची उपस्थिती लावली. इव्हेंटमधील एका व्हिडिओमध्ये, युलिया सलमान खानच्या चित्रपटांमधील अनेक हिट गाणी सादर करताना दिसत आहे. पोनीटेलमध्ये केस बांधलेल्या चमकदार ड्रेसमध्ये सजलेल्या, युलियाने 2014 च्या रिलीज झालेल्या किकमधील जुम्मे की रात आणि 2021 मध्ये रिलीज झालेल्या राधे मधील सीटी मार यासह इतर गाणी सादर केली. विशेष म्हणजे तिने नृत्याच्या ठेक्यावर ही गाणी स्वतः गायली. सिटी मार हे गाणे सादर करत असताना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद देत तिला शिट्यांचा दणदणाट ऐकवला.
आयफा रॉक्समधील युलियाच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सलमानच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. आयफा २०२३ मधील लुलियाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत अनेक चाहत्यांची तिच्या कौतुकाच्या पोस्ट लिहिल्या आहेत. युलिया वंतूर ही रोमानियन गायिका आहे. आजवर तिने हिंदी गाण्यातही आपला हात आजमलवला आहे. गुरू रंधवासोबत तिने दोन वर्षापूर्वी मैं चला या गाण्यासाठी सहगायन केले होते. ती केवळ दिसायला सुंदर नाही तर प्रतिभाशालीही आहे. त्यामुले तिच्यावर सलमान भाळू शकतो हे नक्की आहे. गेल्या काही वर्षातील तिची सलमान सोबतची सलगी हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.