महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सलीम खान यांचा 88 वा वाढदिवस, 'माय टायगर' म्हणत, सलमाननं दिल्या शुभेच्छा - सलीम खान बर्थडे

Salman wishes Salim khan : अभिनेता सलमान खाननं शुक्रवारी वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांच्यासोबतचा सुंदर फोटो शेअर केला. सलीम खान यांचा 24 नोव्हेंबर रोजी 88 वा वाढदिवस साजरा होत असताना सलमाननं त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

salim khan birthday
सलीम खान यांचा 88 वा वाढदिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 7:59 PM IST

मुंबई- Salman wishes Salim khan : सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'टायगर 3' चित्रपटाच्या यशात आनंद साजरा करत आहे. त्यानं आपल्या सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी फोटो शेअर करुन चाहत्यांना आनंद दिला आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक सलीम खान यांचा 24 नोव्हेंबर रोजी 88 वा वाढदिवस आहे. या खास दिवसाच्या निमित्तानं सलमानने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

इंस्टाग्रामवर सलमानने एक फोटो शेअर केलाय. यामध्ये या पिता-पुत्राची जोडी त्यांच्या घराबाहेरील बागेत एक सुंदर क्षण अनुभवताना दिसतेय. सलीम आणि सलमान यांच्यातील निस्सीम स्नेहाचं दर्शन फोटोतून घडतंय. ते एकमेकांना मिठी मारून उत्तम वेळ घालवताना दिसत आहेत. या फोटोसोबत सलमाननं ‘हॅप्पी बर्थडे माय टायगर’ असा हार्दिक संदेश लिहिला आहे.

ही पोस्ट केवळ सलमानचे त्याच्या वडिलांसोबत असलेलं नातं दर्शवत नाही तर कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचं महत्त्वही अधोरेखीत करत आहे. फॅन्स आणि फॉलोअर्सनी सलीम खान यांना शुभेच्छा पाठवून आणि खान कुटुंबाच्या जवळच्या नात्याबद्दल कौतुक व्यक्त करून कमेंट सेक्शन भरून दिले. एका नेटिझनने कमेंट केली, "हॅपी बर्थडे सर.. तुम लोग हमेशा खुश रहे." दुसर्‍याने लिहिलंय, "बॉस का बॉस." तर एका चाहत्याने लिहिले, "टायगर गॉडफादरसोबत."

दरम्यान, सलमानचा नुकताच रिलीज झालेला 'टायगर 3' हा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडत आहे चित्रपटानं अलीकडेच भारतातील बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, असे इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या अहवालात म्हटले आहे. मनीश शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' या थ्रिलर चित्रपटामध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसह अनेक कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खान देखील कॅमिओमध्ये झळकला आहे. यामध्ये हृतिक रोशनला हायलाइट करणारा पोस्ट-क्रेडिट सीन आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details