महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सलमान खाननं 'टायगर' फ्रँचायझीच्या चौथ्या भागाचेही दिले संकेत - सलमान खानची एन्ट्रीही थक्क करणारी

Katrina Salman talk about tiger 4 : 'टायगर 3' च्या यशानंतर अभिनेता सलमान खाननं 'टायगर' फ्रँचायझीच्या चौथ्या भागाचेही संकेत दिलेत. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्डकप फायनला सामन्याच्या दरम्यान त्यानं 'टायगर 4' चा उल्लेख केला.

Katrina Salman talk about tiger 4
'टायगर' फ्रँचायझीच्या चौथ्या भागाचेही संकेत

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 5:32 PM IST

मुंबई - Katrina Salman talk about tiger 4 : सलमान खान, इमरान हाश्मी आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'टायगर 3' हा चित्रपट 12 नोव्हेंबर रोजी रुपेरी पडद्यावर झळकला आणि बॉक्स ऑफिसवर झटपट यशस्वी ठरला. अद्यापही या चित्रपटासाठी लोक थिएटरच्या बाहेर रांगा लावताहेत. तोपर्यंत सलमान खाननं टायगरच्या चाहत्यांसाठी नवी आनंदाची बातमी दिली आहे. त्यानं 'टायगर 4' चित्रपट बनणार असल्याचे संकेत दिले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यासाठी सलमान खान स्टेडियमवर हजर होता. कतरिना कैफसोबत त्यानं टायगर 3 चं प्रमोशनही केलं. यावेळी तो लाईव्ह समालोचनानतही सहभागी झाला होता. यावेळी बोलताना सलमानने 'टायगर 4' चित्रपटाचे संकेत दिले. या चित्रपटातही सलमान टायगरच्या आणि कतरिना झोया या भूमिकेत दिसतील.

यावेळी कतरिना कैफनं विराट कोहलीचं कौतुक केलं. ती म्हणाली, "विराटनं जेव्हा आरसीबीसाठी आयपीएल खेळायला सुरुवात केली तेव्हापासून ते आजपर्यंतचा प्रवास आणि आलेख पाहण्यासारखा आहे." सलमान खान नंतर एक इशारा देण्यासाठी सामील झाला आणि म्हणाला, "तुम्ही टायगर 1 ते टायगर 3 ची प्रतीक्षा 57 पर्यंत केली ना ( सलमान खानचं वय 57 आहे ) आता टायगर 4 ची 60 पर्यंत प्रतीक्षा करा. "

'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' नंतर 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीमधील तिसरा चित्रपट आहे. यात कतरिना कैफ आणि सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत आणि इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत आहे. 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी दरम्यान रिलीज झाल्यानंतर 'टायगर 3' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि बॉक्स ऑफिसवरही चांगले यश मिळवले.

'टायगर' चित्रपटाच्या या तिसऱ्या सीक्वेलमध्ये रेकॉर्डब्रेक 12 अ‍ॅक्शन-पॅक सीक्वेन्सचा भरणा आहे. या चित्रपटातील सलमान खानची एन्ट्रीही थक्क करणारी होती. याव्यतिरिक्त टायगर 3 चित्रपटाचा साउंडट्रॅक, 'रुआन' आणि 'लेके प्रभु का नाम' गाण्याचेही मोठ्या प्रमाणात कौतुक झालंय. या चित्रपटाबद्दल लोकांच्या मनामध्ये अजूनही मोठं कुतुहल आहे.

हेही वाचा -

  1. थलपथी विजयच्या ब्लॉकबस्टर 'लिओ'ची ओटीटी प्रसारणाची तारीख ठरली

2.'या' तारखेला रिलीज होणार रणबीर कपूर आणि रश्मिका स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर

3.ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर अनुष्का शर्मानं विराटला मारली मिठी

ABOUT THE AUTHOR

...view details