मुंबई :बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने ४ ऑगस्ट रोजी ५६ वा वाढदिवस साजरा केला. या पार्टीमध्ये अनेक कलाकार आले होते. मात्र या पार्टीमध्ये भाईजान सलमान खानच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. सलमान आपल्या भावाच्या बर्थडे पार्टीला हटके अंदाजात आला होता. या पार्टीमध्ये सोहेल खानने देखील हजेरी लावली होती. यासोबतच अर्पिता आणि अलविरा या दोन्ही बहिणीही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाल्या होत्या. अरबाज खानने आपल्या भावा-बहिणींसोबत घरी केक कापला. दरम्यान आता त्याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अरबाज खान आपल्या दोन्ही भाऊ आणि बहिणींसोबत हॅप्पी बर्थडे टू यू अशा शुभेच्छा देताना दिसत आहेत. याशिवाय व्हिडिओमध्ये सलमान खान आणि सोहेल खान देखील खूप आनंदी दिसत आहेत. अरबाज खानने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर अनेक चाहते आणि चित्रपटसृष्टीतील कलाकर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
अरबाजच्या पार्टीत सलमान झाला ट्रोल : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने या पार्टीत काळ्या रंगाच्या टी-शर्टवर राखाडी रंगाच्या शर्टसह गुलाबी रंगाची पॅन्ट परिधान केली होती. या लूकमध्ये सलमान नेहमीप्रमाणेच हँडसम दिसत होता, मात्र त्याला या लूकमुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर, वापरकर्ते भाईजानला त्याच्या गुलाबी पॅन्टच्या लूकला 'बार्बी' चित्रपटापासून प्रेरित असल्याचे म्हणत आहेत. सलमान खान हा असा सुपरस्टार आहे. ज्याचा लूक अनेक चाहत्यांना प्रेरणा देतो, सलमानचा हा लूक वापरकर्त्यांना आवडलेला नाही.