महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये ऐतिहासिक विजयासाठी सलमान खानने RRR टीमचे केले अभिनंदन

Salman Khan Congratulates RRR Team:बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023 मध्ये इतिहास घडवणाऱ्या आरआरआर चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन केले आहे.

सलमान खानने RRR टीमचे केले अभिनंदन
सलमान खानने RRR टीमचे केले अभिनंदन

By

Published : Jan 12, 2023, 5:08 PM IST

मुंबई - दक्षिण चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि 'बाहुबली' फेम दिग्दर्शकाच्या 'RRR' चित्रपटाने इतिहास रचला आहे. चित्रपटातील सुपरहिट गाणे नाटू नाटू या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकून देशाला अभिमान वाटला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या टीमवर देशातून आणि जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बॉलीवूडचा 'किंग खान' शाहरुख खाननंतर आता सलमान खानने या ऐतिहासिक विजयावर आनंद व्यक्त करत संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन केले आहे. दबंग खानने यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

विजयावर काय म्हणाला भाईजान? - सलमान खानने ट्विट करून लिहिले की, 'गोल्डन ग्लोब्समध्ये शानदार विजयासाठी आरआरआरच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन'. यासोबतच 'भाईजान'ने चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली, संगीतकार एमएम कीरावानी आणि चित्रपटाची मुख्य स्टारकास्ट राम चरण आणि जूनियर एनटीआर यांनाही टॅग केले आहे.

सलमान खानने RRR टीमचे केले अभिनंदन

इतकेच नाही तर नाटू नाटूच्या विजयाचा अभिमान असलेल्या सलमान खानने आपल्या ट्विटमध्ये ज्येष्ठ संगीतकार एमएम किरावाणी यांचा विजयी क्षणाचा फोटोही शेअर केला आहे, जे या विजयाचे हक्काचे मालक आहेत आणि त्यांनी नाटू नाटू गाण्याची रचना केली आहे.

दोनपैकी एका श्रेणीत यश- एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटाने मूळ गाण्यासाठी गोल्डन ग्लोब मिळवला, मात्र सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर नॉन-इंग्रजी पुरस्कार हातातून निसटला. आरआरआरवर मात करत अर्जेंटिना 1985 ला सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर नॉन-इंग्रजी पुरस्कार मिळाला. आरआरआर हा भारतातील सर्वात मोठा चित्रपट होता. या वर्षी गोल्डन ग्लोब्समध्ये या चित्रपटाकडून मोठ्या आशा बाळगल्या जात होत्या. मात्र चित्रपटाची टीम आणि संपूर्ण भारतवासीयांना एका डोळ्या हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसूचा अनुभव आला. आरआरआरमधील नाटू नाटू गाण्याला मूळ गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला मात्र सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर नॉन-इंग्रजी पुरस्काराने यशापासून हुलकावणी दिली.

आरआरआर या चित्रपटाला कोरियन रोमँटिक मिस्ट्री डिसीजन टू लीव्ह, जर्मन अँटी वॉर ड्रामा ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, ऐतिहासिक नाट्य असलेला अर्जेंटिना, 1985 आणि फ्रेंच-डच कमिंग-ऑफ-एज ड्रामा क्लोज द नॉन-इंग्रजी श्रेणीमध्ये नामांकन मिळाले होते. आरआरआर चित्रपटाने जगभरात 1,200 कोटींहून अधिक (अंदाजे) बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केल्याने ती एक आंतरराष्ट्रीय घटना बनली होती. या चित्रपटात राम चरण आणि जूनियर NTR यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा -Alia Bhatt Trolled:नाटू नाटू गाण्याने गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर आलिया भट्ट झाली ट्रोल

ABOUT THE AUTHOR

...view details