मुंबई - बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेचा भाऊ ऋषभ हेगडेने 30 जानेवारी रोजी शिवानी शेट्टीशी लग्न केले. पूजाने तिच्या भावाच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या भावाच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान वधू-वरांसोबत पोज देताना दिसत आहे.
सलमान पूजा हेगडेचा भाऊ ऋषभच्या लग्नात मंगळुरूमध्ये पोहोचला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेक सोशल मीडिया फॅन क्लबने फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये सलमान वधू-वरांसोबत पोज देताना दिसत आहे. ब्लॅक शर्ट आणि मॅचिंग पॅन्टमध्ये सलमान खान खूपच स्टायलिश दिसत आहे. दुसरीकडे, व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये पूजा लग्नाच्या कार्यक्रमात सलमानच्या 'छोटे छोटे भाईयों के बडे भैया' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पूजा हेगडे सलमानला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र यावर सलमान अथवा पूजाने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र इतक्या बिझी कामात गुंतलेल्या सलमानने मंगळूरु गाठून विवाह समारंभात हेजेरी लावणे याचा युजर्स पुन्हा तोच अर्थ काढत आहेत. यावेळी सलमान हेगडे परिवारासोबत खेळीमेळीच्या वातावरणात वावरत होता. त्याने फोटोला पोज देतानाचे भाव एका नव्या कुटुंबात सामील झाल्याचे आहेत.