मुंबई- सिने जगतात सेलेब्सच्या पार्टीची स्वतःची एक क्रेझ आहे. बहुतेक सेलिब्रिटी वीकेंडला पार्टी करताना दिसतात. अशाच एका पार्टीमुळे आता बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरंतर काल रात्री सलमान एका पार्टीत पोहोचला होता. येथे त्याचा कारमधून उतरतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही चाहते संभ्रमात पडले आहेत, तर काही युजर्स सलमानवर कमेंट करत आहेत. या व्हिडिओमध्ये सलमान खान कारमधून खाली उतरल्यानंतर खिशात भरलेला ग्लास ठेवताना दिसत आहे.
आता या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून सर्वत्र फक्त सलमानचीच चर्चा होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमानने जीन्स आणि निळा टी-शर्ट घातला आहे. वास्तविक काल रात्री तो त्याच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला पोहोचला होता. या व्हिडीओमध्ये सलमान खान त्याच्या कारमधून खाली उतरताना दिसेल आणि अभिनेत्याच्या हातात भरलेला ग्लास आहे. हौशी फोटोग्राफर्सना पाहिल्यानंतर सलमान हा ग्लास खिशात लपवताना दिसतो.