मुंबई -बॉलिवूडचा दबंग खान सलमानची बहीण अर्पिता खान शर्माने ( Salman Khan sister Arpita Khan Sharma ) ईदच्या मुहूर्तावर ( Eid Party ) ग्रँड पार्टी दिली. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलेब्सनी हजेरी ( Bollywood Stars present ) लावली. यादरम्यान सगळ्यांच्या नजरा बिग बॉस फेम आणि पंजाबी गायिका शहनाज गिलवर ( Panjabi singer Shehnaaz Gill ) होत्या. शहनाज गिल सुंदर काळ्या रंगाचा पंजाबी टच सूट परिधान करून ईद पार्टीत पोहोचली होती. पार्टीनंतर सलमान खान ( Salman Khan ) स्वतः शहनाजला कारपर्यंत सोडण्यासाठी गेला होता. यादरम्यान शहनाजचे सलमान खानवरील प्रेम जगजाहीर होत होते.
सलमान खान आणि शहनाज गिलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये शहनाज स्टार सलमान खानला प्रेमाने मिठी मारत असून ती त्याला सोडण्याचे नाव घेत नसल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खानच्या चेहऱ्यावरील हसू कमी होत नसून तो शहनाजचा हा निरागसपणा जपण्याचा प्रयत्न करीत आहे. चाहत्यांना सलमान आणि शहनाजची बाँडिंग खूप आवडते.