मुंबई - गणेश चतुर्थी (31 ऑगस्ट) निमित्त फिल्मी जगतात अनेक घडामोडी घडत असतात. यावेळी सेलिब्रिटींनी गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली. सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा हिने पती आयुष शर्मासोबत आपल्या घरी गणपतीबाप्पाचे स्वागत केले व साग्रसंगीत पूजा केली. सलमान खानसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाने या पूजेला हजेरी लावली आणि बॉलिवूडमधील अनेक स्टार्सही अर्पिताच्या घरी गणपती पूजेला पोहोचले होते. यादरम्यान कॅटरिना कैफने पती विकी कौशलसोबत हजेरी लावली होती.
येथे सलमान खान पांढऱ्या शर्ट आणि डेनिममध्ये बहिण अर्पिताच्या घरी पूजा करण्यासाठी पोहोचला. सलमान खानने कुटुंबासोबत गणपतीची आरतीही केली, ज्याचा व्हिडिओ सलमान खानने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
त्यावेळी गणपती पूजेमध्ये कॅटरिना कैफ आणि विकी कौशल या नवविवाहित जोडप्यावरही सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. कॅटरिना सुंदर सूट सलवार आणि विकी कौशल पिवळा कुर्ता आणि पांढऱ्या पायजामामध्ये गणेश पूजेसाठी पोहोचले होते.