मुंबई - Manish Malhotras Diwali bash : सुपरस्टार सलमान खाननं मनीष मल्होत्राच्या दिवाळी बॅशला स्टाईलमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यानं काळ्या रंगाची कार्गो पॅंट, एक साधा राखाडी टी-शर्ट आणि काळे शूज घातले होते. त्याने हसतमुखानं कॅमेऱ्यांसमोर पोझ दिली आणि फोटोग्राफर्सनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.
मनीष मल्होत्रानं आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, माधुरी दीक्षित, सारा अली खान, रिया चक्रवर्ती, सूरज पांचोली, साक्षी धोनी, आदित्य ठाकरे, मीझान जाफरी, शोभिता धुलिपाला, राधिका मदन, फख्ती फ्रेडी दारुवाला, जान्हवी कपूर, वीर पहारिया, शिखर पहारिया, भूमी पेडणेकर, पूजा हेगडे, ऐश्वर्या राय बच्चन, अर्जुन कपूर, अनन्या पांडे, चंकी पांडे, सान्या मल्होत्रा, रवीना टंडन, रशा थडानी, एकता कपूर, इब्राहिम अली खान यासह बॉलिवूडचे तारे तारकांनी भाग घेतला.
नीता अंबानींची उपस्थिती
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत नीता अंबानींनं आपल्या सौंदर्याने उपस्थितांना भुरळ घातली. या पार्टीत ती मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंटसोबत पोहोचली होती. नीताने पार्टीसाठी निळ्या रंगाची साडी निवडली होती. भारी भरतकाम केलेल्या लेहेंग्यात राधिका खूपच सुंदर दिसत होती. पार्टीत जाण्यापूर्वी दोघेही ग्रीन कार्पेटवर पापाराझींसाठी हसतमुख पोज देताना दिसले.
माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय
त्याचवेळी ऐश्वर्या राय लाल रंगाचा सुंदर सूट परिधान करून पार्टीत पोहोचली. हलका मेकअप, लाल ओठांचा रंग आणि मोकळे केस यामुळे माजी मिस वर्ल्ड एखाद्या परीसारखी दिसत होती.
रेखा आणि गौरी खान
सदाबहार अभिनेत्री रेखाही पार्टीत आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवताना दिसली. काळ्या आणि सोनेरी रंगाच्या साडीमध्ये रेखा खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिनं पापाराझींना दिवाळीच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्या. यावेळी पांढऱ्या साडीत पोहोचलेल्या शाहरुख खानची सुंदर पत्नी गौरी खाननेही पापाराझींसाठी पोज दिली.