मुंबई- Tiger vs Pathaan : सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. रिलीजला दोन दिवस शिल्लक राहिलेलं असताना त्यानं या चित्रपटाच्या शुटिंगमधील आव्हानात्मक आणि आनंददायी गोष्टींबद्दल भाष्य केलं. त्यासोबतच 'टायर व्हर्सेस पठाण' या आगामी चित्रपटाच्या शुटिंगबद्दलही सूतोवाच केलंय.
'टायगर 3' शूटच्या सर्वात आव्हानात्मक भागाबद्दल विचारले असता, सलमान म्हणाला की, बाईकचा पाठलाग करणारा सीन सर्वात कठीण होता कारण त्यासाठी मोठ्या प्रमाणात शूटिंग करणं आवश्यक होतं. दिग्दर्शक मनीश शर्मानं याबाबत तपशीलवार चर्चा केली आणि त्यानं त्याला हवा असलेला सीन साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले.
'लेके प्रभु का नाम' या गाण्याच्या शुटिंगमध्ये खूप मजा आल्याचं सलमाननं सांगितलं. या गाण्याचं शुटिग तुर्कस्तानातील कॅपाडोशिया येथे पार पडलं होतं. सलमान म्हणाला की, त्याची सह-कलाकार कतरिना कैफ ही चार्टबस्टर आहे आणि तिनं जगभरातील प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन केलंय. 'लेके प्रभु का नाम' या गाण्यामुळं त्यात भर पडल्याचं सलमाननं सांगितलं.
'टायगर व्हर्सेस पठाण' बद्दल बोलताना सलमान म्हणाला, "टायगर नेहमीच तयार असतो त्यामुळे त्याच्याबाबतीत जेव्हा जेव्हा गोष्टी लॉक केल्या जातात - मी तिथे असतो!" या चित्रपटात सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात एकजबरदस्त संघर्ष पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार असल्याचं यापूर्वीच्या बातम्यातून प्रसिद्ध झालंय.
'टायगर व्हर्सेस पठाण' चित्रपटाची टीम दिवाळीत 'टायगर 3' रिलीज झाल्यानंतर या वर्षी नोव्हेंबरमध्ये शुटिंगच्या पूर्व तयारीला सुरुवात करेल. मार्च 2024 मध्ये प्रत्यक्ष शुटिंगला सुरू होण्यापूर्वी हा चित्रपट पाच महिन्यांच्या प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यातून जाईल.