महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Salman-Shahrukh Team Up: 'करण-अर्जुन' पुन्हा येणार एकत्र, आदित्य चोपडाच्या मेगा अ‍ॅक्शन चित्रपटात दिसणार सलमान-शाहरुख - mega action film

शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या मेगा अ‍ॅक्शन चित्रपटाची ( mega action film ) तयारी सुरू आहे. तब्बल 28 वर्षांनंतर सलमान खान आणि शाहरुख खान एका चित्रपटात एकत्र मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 2024 साली चित्रपट प्रदर्शित होणार ( film will release in 2024 ) आहे.

Salman-Shahrukh Team Up
सलमान-शाहरुख पुन्हा येणार एकत्र

By

Published : Jul 5, 2022, 12:22 PM IST

Updated : Jul 5, 2022, 12:44 PM IST

हैदराबाद -बॉलिवूडचे सुपरस्टार ( Bollywood superstar ) शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.बॉलिवूडचे दोन सुपरस्टार आणि 'करण-अर्जुन' ( Karan Arjun movie ) मधील मुख्य कलाकार शाहरुख आणि सलमान दोघे पुन्हा एकत्र चित्रपट करणार आहेत. शाहरुख खान आणि सलमान खान हे दोघेही एका मेगा अ‍ॅक्शन सिनेमात ( mega action film ) झळकणार असल्याची बॉलिवुडमध्ये चर्चा आहे.

चाहत्यांना देणार खास भेट -2024 साली अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान ( Salman Khan and Shah Rukh Khan ) हे चाहत्यांना खास भेट देणार आहेत. वास्तविक शाहरुख खान आणि सलमान खान आतापर्यंत एकमेकांच्या चित्रपटात पाच मिनिटांचा रोल करून चाहत्यांना आकर्षित करत होते. पण आता तसे होणार नाही. कारण आता बॉलिवूडचा करण-अर्जुन पुन्हा कमबॅक करणार असल्याची बातमी आहे.

यशराज बॅनरखाली चित्रपट बनवणार- माध्यमातील वृत्तानुसार शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चित्रपटाविषयी एक खास कथा तयार केली जात आहे. यशराज बॅनरचे मालक आदित्य चोप्रा ( Yashraj Banner owner Aditya Chopra ) या दोन सुपरस्टार्सला घेऊन चित्रपट बनवणार आहेत. हा एक हाय ड्रामा अ‍ॅक्शन सिनेमा असेल. ज्यामध्ये, शाहरुख-सलमान फूल अ‍ॅक्शन मूडमध्ये दिसणार आहेत. करण-अर्जुन (1995) नंतर बराच काळ शाहरुख-सलमान पडद्यावर दिसणार आहेत. शाहरुख आणि सलमान 27 वर्षांनंतर एका चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत

पठाण, डंकी आणि जवान -शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो पठाण, डंकी आणि जवान या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. पठाण 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. त्याचबरोबर शाहरुख खान राजकुमार हिरणसोबत 'डंकी' चित्रपटासाठी वेळ काढत आहे. याशिवाय 'जवान' चित्रपटाची घोषणा करून शाहरुख खानने याआधीच दबदबा निर्माण केला आहे. साऊथचे दिग्दर्शक अरुण कुमार उर्फ ​​अ‍ॅटली जवान हा चित्रपट बनवित आहेत. पुढील वर्षी जूनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -R Madhavan On Nambi Narayanan: नंबी नारायणन यांना भेटल्यावर माझं आयुष्य आमूलाग्र बदललं : आर माधवन!

Last Updated : Jul 5, 2022, 12:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details