महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

‘इंडियन आयडॉल’मधील सलमान अलीने मराठी ‘अन्य’ साठी केले पार्श्वगायन! - Salman Ali sang Anya

हिंदी ‘इंडियन आयडॉल’ च्या १० व्या सिझन चा उपविजेता सलमान अलीच्या पहाडी पद्धतीच्या गायनशैलीने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. त्याला सलमान खान च्या ‘दबंग ३’ मध्ये पार्श्वगायनाची संधी मिळाली होती. आता सलमान अली ‘अन्य’ मधून मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन करीत असून त्याचे धमाकेदार गाणे चित्रपटाचा उच्च केंद्रबिंदू ठरेल असे म्हटले जात आहे. थोडक्यात ‘अन्य' चित्रपटाद्वारे इंडियन आयडल फेम सलमान अलीची मराठीत एंट्री होत आहे.

सलमान अली
सलमान अली

By

Published : Jun 7, 2022, 5:28 PM IST

मुंबई - आज मराठी सिनेसृष्टीचा डंका संपूर्ण जगभर वाजत आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपासून पुरस्कार सोहळ्यांपर्यंत सर्वच ठिकाणी मराठीचा झेंडा डौलानं फडकत आहे. जागतिक पातळीवर मराठीनं सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवणाऱ्या मराठी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी आज बरेच कलाकार, गायक, संगीतकार आतुरले आहेत. अशांपैकीच एक असणाऱ्या इंडियन आयडल फेम सलमान अलीला 'अन्य' या आगामी चित्रपटामुळं मराठी भाषेचा गोडवा चाखण्याची संधी मिळाली आहे.

निर्माते शेलना के. आणि सिम्मी यांनी इनिशिएटीव्ह फिल्म्सच्या बॅनऱखाली कॅपिटलवुडसच्या सहयोगानं 'अन्य'ची निर्मिती केली आहे. लेखक-दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सिम्मी यांनी आजवर दक्षिणात्य चित्रपटांमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. हिंदीतील दिग्गज गायकांच्या पावलावर पाऊल टाकत सलमाननं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. मराठीसोबत हिंदी भाषेतही बनलेल्या 'अन्य' या चित्रपटानं सलमान अलीची मराठी चित्रपटात पार्श्वगायन करण्याची इच्छा पूर्ण केली आहे.

‘अन्य’ या चित्रपटातील हिंदी गाण्यासोबतच मराठीतील 'ऐक पाखरा...' हे मराठी गाणंही सलमाननं गायलं आहे. प्रशांत जमादार आणि सजीव सारथी यांनी या गाण्याचं लेखन केलं असून, सुमधूर संगीतसाज चढवण्याची जबाबदारी संगीतकार रामनाथ यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. हिंदीमध्ये हे गाणे 'ओ रे परींदे...' असं असून, सजीव सारथी यांनी लिहिलं आहे. हे गाणंसुद्धा रामनाथ यांनीच संगीतबद्ध केलं आहे.

“'अन्य'सारख्या समाजातील महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करण्याची संधी मिळाल्यानं मी आनंदी आहे. यासाठी संगीतकार रामनाथ आणि दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांना खूप खूप धन्यवाद कारण त्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होऊ शकले. 'ऐक पाखरा...' या मराठी गाण्यात सुरेख शब्दरचना केली असून, त्याच तोलामोचं संगीत दिल्यानं गाणं गाताना एक वेगळंच फिलींग आलं. रसिकांनाही गाणं ऐकताना त्याची नक्कीच जाणीव होईल. याच गाण्याचं हिंदी व्हर्जन असणारं 'ओ रे परींदे...' हे गाणंही श्रवणीय झालेय आणि सर्वांना ते आवडेल याची मला खात्री आहे”, सलमान अली व्यक्त होत म्हणाला.

'अन्य'मध्ये रायमा सेन, अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे, यशपाल शर्मा आणि गोविंद नामदेव आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. 'अन्य'चं संवादलेखन महेंद्र पाटील यांनी केलं असून, सिनेमॅटोग्राफी सज्जन कालाथील यांची आहे.

समाजातील ज्वलंत मुद्द्यांकडे लक्ष वेधणारा 'अन्य' १० जून रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -'कभी ईद कभी दिवाली'चे शीर्षक बदलले, 'भाईजान'साठी नव्या कलाकारांची एन्ट्री

ABOUT THE AUTHOR

...view details