महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रभासच्या सालारचा ट्रेलर रिलीज, उत्कंठा वाढवणाऱ्या दृष्यांनी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Salaar Trailer release बाहुबली फेम प्रभासचा चित्रपट सालार - सीझफायर चा ट्रेलर नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या दृष्यांच्यामुळे अतिशय दमदार असा हा ट्रेलर दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सालारचा ट्रेलर रिलीज
सालारचा ट्रेलर रिलीज

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 7:53 PM IST

हैदराबादSalaar Trailer release-आदिपुरुष चित्रपटाचं अपयश पुसून टाकण्यासाठी बाहुबली फेम प्रभास सज्ज आहे. त्याचा बहुप्रतीक्षित 'सालार: भाग १ - सीझफायर' चित्रपटाचा ट्रेलन नुकताच रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी टिजर दाखवून या ट्रेलर रिलीजची उत्सुकता वाढवली होती. चित्रपटाचे निर्माते विजय किरागांडूर यांनी त्याबाबतचा फोटोही ट्विटर अर्थात X वर शेअर केला होता. या फोटोमध्ये तो ट्रेलर पाहात असताना दिसत होता. आता ट्रेलर रिलीज झाल्यानं मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता अजूनही वाढली असणार हे निश्चित आहे.

सालारचा ट्रेलर रिलीज झाल्यावर फक्त १० मिनिटात युट्यूबवर हा ट्रेलर तब्बल २४ लाख लोकांनी पाहिला आहे. त्यावरुन लोकांची या चित्रपटाबद्दल किती उत्सुकता आहे, ते समजून येईल. 'सालार' ट्रेलरच्या रिलीजची लोक अतिशय उत्कंठतेनं प्रतीक्षा करत होते. आज संध्याकाळी 7 वाजून 19 मिनीटांनी हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. सोशल मीडियावर ट्रेलरची जबरदस्त चर्चा होताना दिसली. निर्मात्यांनी ट्रेलर लॉन्चपूर्वी "हा सलार ट्रेलर दिवस आहे" अशी घोषणा करणार्‍या पोस्टसह X वर खळबळ उडवून दिली होती. विजयच्या टीझरच्या फोटोनंतर, उत्साही प्रभासच्या चाहत्यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर प्रतिक्रियांचा वर्षाव केला. "सालार ट्रेलर फ्रॉम टुडे" हा हॅशटॅग लॉन्च करण्यात आला. आधी कळवल्याप्रमाणे, आज संध्याकाळी सालार ट्रेलरचे लॉन्चिंग केले. निर्मात्यांनी अत्यंत अपेक्षित प्रमोशनल मटेरियल गुलदस्त्यात ठेवलं होतं. चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेच्या जवळ 'सालार' ट्रेलर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

'केजीएफ' साठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक प्रशांत नील आणि 'बाहुबली' अभिनेता प्रभास एकत्र काम करत असल्यामुळे चित्रपटाबद्दलची हाईप वाढली आहे. या जोडीचा हा हाय-ऑक्टेन सिनेमॅटिक एक्स्ट्राव्हॅगान्झा तयार करण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न 'सालार' असणार आहे. पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन आणि जगपती बाबू यांचा समावेश असलेल्या कलाकारांचे नेतृत्व करत प्रभासने सालारची मुख्य भूमिका साकारली आहे.

'सालार' 22 डिसेंबर रोजी तेलुगू, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि हिंदी या पाच भाषांमध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'आदिपुरुष' चित्रपटाच्या अपयशानंतर प्रभाससाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित आणि शाहरुख खान अभिनीत 'डंकी' आणि 'सालार' यांच्यातील बॉक्स ऑफिसवरील संघर्ष शाहरुखचा चित्रपट आणि होंबळे फिल्म्सच्या निर्मितीमधील दुसरा संघर्ष आहे. विशेष म्हणजे म्हणजे, 2018 मध्ये होंबाळे फिल्म्सनं निर्मिती केलेल्या 'केजीएफ'ची टक्कर शाहरुखच्या 'झीरो'सोबत झाली होती. अर्थाच 'झीरो'ला अपयश आले होते हे सर्वश्रृत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details