महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Salaar to arrive in November: 'प्रभास'च्या सालारचे रिलीज नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर

Salaar to arrive in November: सालार चित्रपटाचे प्रदर्शन नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर केली जाणारंय. ही माहिती ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर दिलीय.

Salaar to arrive in November:
सालारचे रिलीज नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 4:12 PM IST

मुंबई - Salaar to arrive in November आगामी सालार चित्रपटाचं प्रदर्शन पुढं ढकलण्यात आलं आहे. आधी ठरल्यानुसार याचं प्रदर्शन २८ सप्टेंबर २०२३ रोजी होणार होतं. मात्र हा सिनेमा आता नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन अत्यंत वेगात सुरू आहे. होंबाळे फिल्म्स निर्मिती करत असलेला सालार चित्रपट नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर केली जाणारंय. ही माहिती ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर दिलीय.

साऊथस्टार प्रभासचा हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा महा चित्रपट या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसापूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या रिलीजची तारीखही ठरल्यामुळे चाहते चित्रपटाची प्रतीक्षा करत होते. मात्र आता त्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत आणखी ताटकळावं लागणार आहे.

'सालार: भाग १ - सीझफायर'चा टीझर प्रेक्षकांसाठी आश्चर्यचकित करणारा होता. चित्रपटाबद्दलचा अधिक तपशील गुलदस्त्यात असला तरी यात प्रभास आंतरराष्ट्रीय माफियांशी लढताना दिसला होता. यामध्ये भव्य सेट अप, डोळे दीपवणारी दष्ये, जबरदस्त अ‍ॅक्शन आणि अनोख्या अवतारातील प्रभासची एन्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटात आंतरराष्ट्रीय माफिया टोळीतील अंतर्गत संघर्ष दाखवण्यात आलाय. या चित्रपटाचा दिग्दर्शक प्रशांत नीलने यापूर्वी 'केजीएफ' हा ब्लॉकबस्टर चित्रपट बनवलाय. त्यामुळे प्रभाससाठी हा एक मोठा प्लस पाईंट ठरु शकतो. कारण त्याचा आदिपुरुष चित्रपट नुकताच फ्लॉप झालाय. त्यापूर्वीही त्याचा राधे श्याम हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर प्रभावी ठरला नव्हता.

'सालार' चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग :सालार चित्रपटाची आधी रिलीज तारीख ठरल्यामुळे चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंगही सुरू करण्यात आली होती. यासाठी चाहत्यांचा उत्तम प्रतिसादही मिळत होता. सालार चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगची तुलना शाहरुख खानच्या 'जवान'शी सुरू झाली होती. २८ ऑगस्टपर्यंत सालारची १४६१९ तिकीटांची विकी झाली होती आणि रिलीजपूर्वीच या चित्रपटाने 3.45 कोटीची कमाई केली होती. मात्र आता चित्रपटाची रिलीजच पुढे ढकलण्यात आल्यानं आता ही सर्व चर्चा थांबणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details