मुंबई - Salaar success bash: 'सालार भाग 1 - सीझफायर'ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता प्रभास पुन्हा एकदा चित्रपटाच्या टीमसोबत बंगळूरूमध्ये एकत्र आला. दिग्दर्शक प्रशांत नील, श्रुती हासन, जगपती बाबू आणि इतर कलाकार शुक्रवारी रात्री हाय अल्ट्रा लाउंजमध्ये 'सालार' सक्सेस पार्टीमध्ये सहभागी झाले. या खास इव्हेन्टमध्ये डेकोरेशनपासून ते ड्रेस कोडपर्यंत एक आकर्षक काळ्या रंगाची थीम होती.
श्रुती हासन आणि सहकारी कलाकारांनी या भव्य सोहळ्याची झलक शेअर 'सालार' सक्सेस पार्टीमधील असंख्य व्हिडिओ आणि फोटोंमुळे सोशल मीडियावर गर्दी झाली होती. प्रभास काळ्या रंगाच्या कपड्यात डॅशिंग दिसत होता, त्याने मॅचिंग ब्लेझर आणि पँटसह काळा टी-शर्ट घातला होता. यावेळी त्यानं पिवळ्या रंगाचा चष्मा घातला होता.
'सालार'च्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर काळ्या रंगाच्या थीममध्ये सुशोभित केलेल्या ठिकाणाचे फोटो देखील शेअर केले आहेत. या सजावटीमध्ये चित्रपटाच्या प्रॉपर्टीचाही समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे, श्रुतीच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक संदेश असलेला बोर्ड आहे: "कोणीही तुझ्याशी उपमा म्हणून वागू नये. डार्लिंग तू बिर्याणी आहेस." आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की, चाहते प्रभासला 'डार्लिंग' या टोपण नावानेच ओळखतात आणि त्यालाही असे बोलल्याचे आवडते.
'सालार'च्या सक्सेस पार्टीपूर्वी शुक्रवारी, प्रभास, प्रशांत नील आणि होंबळे फिल्म्सचे प्रमुख विजय किरगंडूर यांनी कर्नाटकातील मंगलोर येथील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिराला भेट दिली. या तिघांनी मंदिरात नतमस्तक होऊन देवीचा आशीर्वाद घेतला.
'सालार भाग 1 - सीझफायर'ने जागतिक बॉक्स ऑफिसवर 700 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या सीक्वेलचे काम सध्या सुरू आहे. होंबळे फिल्म्सद्वारे निर्मित, हे चित्रपटाचे दोन भाग मन्नार, शौर्यांगस आणि घनियार या तीन जमातींनी शासित असलेल्या खानसार या काल्पनिक शहरात दोन बालपणीच्या मित्रांचे शत्रू बनल्याची कथा आहेत. जेव्हा मन्नार वर्चस्व मिळवण्याची अपेक्षा बाळगतात तेव्हा संघर्ष निर्माण होतो आणि एकेकाळी अविभाज्य मित्रांमध्ये फूट निर्माण होते.
'सालार'च्या यशाला प्रभासच्या करिअरमध्ये महत्त्व आहे. 'बाहुबली' भाग 1 आणि 2 च्या प्रचंड यशानंतर, प्रभासला अलीकडे यश हुलकावणी देत होते. 'सालार'चे व्यावसायिक यश हा अभिनेता प्रभाससाठी एक महत्त्वाचा क्षण ठरला आहे, जो त्याच्या संपूर्ण भारतातील स्टारडमला साजेशा यश मिळवत असल्यानं त्याच्या चाहत्यांमध्येही उत्साह संचारला आहे.
हेही वाचा -
- राम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई
- "अॅनिमल हिंदी सिनेमासाठी गेम चेंजर" म्हणत, संदीप रेड्डी वंगाच्या समर्थनार्थ उतरला अनुराग कश्यप
- रणबीर कपूर स्टारर रामायण चित्रपटाला होणार सुरुवात, नियोजनबद्ध शूटिंग शेड्यूल तयार