मुंबई - Salaar release trailer: 'सालार: भाग 1 - सीझफायर' चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढलेली असताना या अॅक्शन-पॅक्ड चित्रपटाचा या बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. होंबळे फिल्म्सने 18 डिसेंबर रोजी सालार रिलीज ट्रेलरचे लॉन्चिंग केले. ही प्रमोशनल अॅसेट एक रोमांचकारी झलक देणारी आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी साकारलेली सालारची दुनिया अतिभव्य आहे. प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या या दोन भागांच्या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, बॉबी सिम्हा आणि जगपती बाबू यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
सुमारे तीन मिनिटांच्या 'सालार' ट्रेलरमध्ये खानसार या काल्पनिक शहराची ओळख करून देण्यात आली आहे. हाय-व्होल्टेज अॅक्शन सीक्वेन्सने भरलेल्या या ट्रेलरमध्ये प्रभास अतिशय बलदंड दिसत असून त्याचा अनोखा आक्रमक अवतार यात पाहायला मिळत आहे. यात प्रभासला देवाच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. यात देवा पृथ्वीराज सुकुमारन याने साकारलेला त्याचा मित्र वरधराज मन्नारसाठी काहीही करायला तयार असलेला वन-मॅन आर्मी आहे. या बालपणीच्या मित्रांचे कट्टर-शत्रूंमध्ये रूपांतर या चित्रपटाच्या पहिल्या भागात होताना पाहायला मिळेल. सालार रिलीजच्या ट्रेलरमध्ये श्रुती हासनचीही झलक पाहायला मिळतेय.