मुंबई - Salaar movie updates : अभिनेता प्रभासच्या आगामी 'सालार: भाग 1 - सीझफायर' चित्रपटाकडून त्याच्या चाहत्यांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये कोणतीही कसर रोहणार नाही याची खबरदारी 'KGF' फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांनी घेतलीय. या चित्रपटात नेत्रदीपक दृष्यांचा आणि वेगवान अॅक्शन्सचा धमाका पाहायला मिळणार आहे. प्रशांत नीलच्या नेतृत्वाखालील टीमनं अलिकडेच एक प्रचंड अॅक्शन सीन शूट केला ज्यासाठी निर्मात्यांनी तब्बल 750 वाहनांचा वापर केला.
प्रभासचा आगामी 'सालार: भाग 1 - सीझफायर' हा चित्रपट अफाट अॅक्शन सीक्वेन्ससह प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. काही दिवसापूर्वी 'सालार' चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी थिएटरमध्ये जाण्यासाठीची तयारी सुरू केलीय. साऊथ सुपरस्टार प्रभास आणि यशस्वी दिग्दर्शक प्रशांत नील पहिल्यांदाच एकत्र आल्यानं हा सर्वात अॅक्शन-पॅक चित्रपट होणार असल्याची खात्री निर्मात्यांनी दिलीय. 'सालार'च्या प्रॉडक्शन टीममधील एका आतल्या व्यक्तीने यातील अॅक्शन सीक्वेन्सवर एक स्कूप शेअर केला. 'सालारच्या शूटिंगसाठी जीप, टँक, ट्रक इत्यादींसह 750 हून अधिक विविध वाहने वापरण्यात आली, कारण 'सालार : भाग 1 - सीझफाय'र चित्रपटात जमिनीवर भरपूर अॅक्शन आहे. कोणत्याही मोठ्या युद्धाच्या सीक्वेन्सइतकाच तो सीन मोठा होता.'
'सालार: भाग 1 सीझफायर' चित्रपट KGF चित्रपट मालिकेत पाहिल्याप्रमाणे, त्यातील भव्यतेमुळे आणि प्रशांत नीलच्या आक्रमक अॅक्शन सीन तयार करण्यातील कौशल्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत टॉक ऑफ द टाऊन बनलाय. प्रशांत नील आणि प्रभास एकत्र आल्यानं प्रेक्षकांच्या चित्रपटाकडून अपेक्षा खूप उंचावल्या आहेत. मल्याळम सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासनसोबत प्रभास स्क्रिन स्पेस शेअर करत असल्यामुळेही चित्रपटाबद्दलची हाईप वाढली आहे.