मुंबई- Salaar box office day 7: अभिनेता प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन यांच्या प्रमुख भूमिका असलेला प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार - भाग 1 सीझफायर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. गेल्या आठवडाभरापासून हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रभावीपणे चालू आहे. चित्रपटाने भारतात सातव्या दिवशी (गुरुवार) 300 कोटी रुपयांचा टप्पा पार केला.
'सालार भाग 1: सीझफायर' गेल्या शुक्रवारी पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर यशस्वी पदार्पण केल्यानंतर, पहिल्याच दिवशी 90 कोटींहून अधिक कमाई करणारा आणि सर्वात मोठा ओपनिंग देणारा भारतीय चित्रपट ठरला होता. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, चित्रपटाने सात दिवसांमध्ये भारतात एकूण 308.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सॅकनिल्कने जारी केलेल्या बॉक्स ऑफिस आणि ऑक्युपन्सी रिपोर्ट्सच्या आधारावर, सातव्या दिवसाचे कलेक्शन भारतातील सर्व भाषांमध्ये 13.50 कोटी रुपये झाले आहे. दरम्यान चित्रपटाच्या टीमने असा दावा केला आहे की, रिलीजच्या पाचव्या दिवशी जगभरात 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे त्यामुळे परदेशी कलेक्शनही आता 550 कोटींच्या दिशेने सुरू आहे. सालारच्या या विक्रमी कामगिरीने प्रभास हा एकमेव दक्षिण भारतीय अभिनेता बनला आहे ज्याचे 500 कोटींच्या क्लबमध्ये तीन चित्रपट आहेत आणि त्याच्यानंतर रजनीकांत जेलर (650 कोटी) आणि 2 पॉइंट 0 (800 कोटी) या दोन चित्रपटांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
'सालार' बद्दल बोलायचे झाले तर प्रशांत नीलच्या 2014 च्या कन्नड चित्रपट 'उग्रम'चे रूपांतर आहे. हा चित्रपट दोन बालपणीच्या मित्रांची कथा आहे. चित्रपटाचा सिक्वेल 'देवा' या पात्राच्या कथांमध्ये खोलवर जातो. यामध्ये प्रभासने देवाची भूमिका केली आहे तर पृथ्वीराजने वरदराजा मन्नार ही व्यक्तीरेखा साकारली आहे. हे घनिष्ठ मित्र कसे कट्टर शत्रू बनले हे कथानकातून उलघडत जाते. जगपती बाबू, बॉबी सिम्हा, श्रिया रेड्डी आणि इतरही चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत.
हेही वाचा -
- 'अभिनेता विजयकांत गेला यावर विश्वास बसत नाही'; 9 वीतील मित्रानं जागवल्या 'कॅप्टन'च्या आठवणी
- 'धूम' फ्रँचाईजमध्ये किंग खान असू शकतो आगामी आकर्षण?
- 'चीनी कम फेम' स्विनी खाराच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल