मुंबई- Salaar box office day 3: 'सालार: भाग 1 - सीझफायर' चित्रपटाने तिसर्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर वर्चस्व राखले आहे. यामुळे देशभरातील चित्रपट प्रेक्षकांमध्ये उत्साह आणि अपेक्षा निर्माण झाली आहे. सॅकनिल्कच्या मते, सुपरस्टार प्रभास आणि ब्लॉकबस्टर 'केजीएफ' मालिकेचे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या या नव्या 'सालार' चित्रपटाने तिसर्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर राज्य केले असून, एकट्या भारतात 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाची कमाई आधी केलेल्या अंदाजापेक्षा जास्त होती. विशेषत: दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू सारख्या प्रमुख शहरी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक सालारकडे आकर्षित झाल्याचे दिसते. 'सालार'च्या ट्रेलरला मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे सोशल मीडियावर 100 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि त्यामुळे आगाऊ बुकिंगची संख्याही आणखी वाढली आहे. 'सालार'च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर चित्रपटाची सर्वात अलीकडील जागतिक कमाई 295 कोटी रुपये झाल्याची नोंद दिसत आहे.
यात प्रभासचे एक पोस्टर शेअर करण्यात आले असून त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "विक्रमी ब्लॉकबस्टर. 295.7 बिलियन ग्लोबल बॉक्स ऑफिस कलेक्शन (जगभरात 2 दिवस). शिकारीचा हंगाम सुरू झाला आहे..." सालारने जागतिक बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले आहे, फक्त दोन दिवसात 295.7 कोटीची जागतिक स्तरावर कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकिंग वेबसाइट सॅकनिल्कनुसार 'सालार : भाग 1 - सीझफायर'ने तिसर्या दिवशी सर्व भाषांसाठी अंदाजे 53.86 कोटीची कमाई भारतीय बॉक्स ऑफिसवर केली. त्यामुळे 'सालार'चे भारतातून बॉक्स ऑफिसचे एकूण संकलन 200.91 कोटी झाले आहे.