महाराष्ट्र

maharashtra

'सालार'चा बॉक्स ऑफिसवर अजूनही जलवा

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 8:41 AM IST

Salaar Box Office Collection Day 16 Worldwide : प्रभास अभिनीत 'सालार'च्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करताना दिसत आहे. आता या चित्रपटानं देशांतर्गत 387 कोटीची कमाई केली आहे. याशिवाय जगभरात हा चित्रपट कमाल करताना दिसत आहे.

Salaar Box Office Collection Day 16 Worldwide
सालारचं जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १६

मुंबई - SalaarBox Office Collection Day 16 Worldwide: अभिनेता प्रभास स्टारर 'सालार' बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करत आहे. या चित्रपटानं काही दिवसांपूर्वीच 600 कोटींचा टप्पा ओलांडला होता. आता हा चित्रपट झपाट्यानं 700 कोटीच्या क्लबकडे वाटचाल करत आहे. 'सालार'नं आतापर्यंत जगभरात 675 कोटीचा व्यवसाय केला आहे. तब्बल 7 वर्षांनंतर प्रभासनं सुपरहिट चित्रपट दिला आहे. प्रभासचा शेवटचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाहुबली 2' होता. हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झाला होता. प्रभास स्टारर 'साहो', 'राधे श्याम' आणि 'आदिपुरुष' यासारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत.

'सालार' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन :'सालार' चित्रपटामध्ये प्रभासशिवाय टिनू आनंद, पृथ्वीराज सुकुमारन, मीनाक्षी चौधरी, जगपती बाबू आणि श्रुती हसन यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान 'सालार'च्या यशानंतर प्रभास लवकरच 'कल्की 2898 एडी'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केलं आहे. हा चित्रपट 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये प्रभास वेगळ्या अवतारात दिसला आहे. 'सालार' चित्रपटामध्ये प्रभाससोबत अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, सलमान, दिशा पटानी, राणा डग्गुबती हे कलाकार दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटामध्ये कमल हसन हे खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. आता हा चित्रपट 7 जानेवारी रोजी रिलीजच्या सतराव्या दिवसात आहे. रिलीजच्या सतराव्या दिवशी 'सालार' प्रचंड बॉक्स ऑफिसवर कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे.

'सालार'चा एकूण जगभरातील कलेक्शन (कोटी रुपयामध्ये)

  • पहिला दिवस- 176.52 कोटी
  • दुसरा दिवस- 101.39 कोटी
  • तिसरा दिवस- 95.24 कोटी
  • चौथा दिवस- 76.91 कोटी
  • पाचवा दिवस- 40.17 कोटी
  • सहाव्या दिवशी - 31.62 कोटी
  • सातवा दिवस - 20.78 कोटी
  • आठवा दिवस- 14.21 कोटी
  • नववा दिवस- 21.45 कोटी
  • दहावा दिवस- 23.09 कोटी
  • अकरावा दिवस - 25.81 कोटी
  • बारावा दिवस- 12.15 कोटी
  • तेरावा दिवस- 11.07 कोटी
  • चौदावा दिवस- 9.28 कोटी
  • पंधरावा दिवस- 7.90 कोटी
  • सोळावा दिवस- 9.78 कोटी
  • चित्रपटाचं एकूण कलेक्शन - 677.37 कोटी

हेही वाचा :

  1. 'अ‍ॅनिमल'च्या सक्सेस पार्टीमध्ये रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी दिसल्या एकत्र
  2. 'मेरी ख्रिसमस'ची कास्ट झाल्यानंतर कतरिना कैफनं केलं होतं विजय सेतुपतीला गुगल सर्च
  3. आयरा खाननं भाऊ जुनैद खानसोबत शेअर केला फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details