मुंबई - Salaar box office collection: प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार: भाग 1 सीझफायर' चित्रपटातून प्रभासने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलं आहे. या चित्रपटाची जगभर वादळी सुरुवात झाली आणि बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडे विक्रमी ठरले.
'सालार'चे जगभरातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन
व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी 'सालार' हा आजवरचा पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असल्याचा दावा केलाय. यापूर्वी प्रभास स्टारर 'आदिपुरुष' चित्रपटानं 86.75 कोटींची कमाई भारतीय बॉक्स ऑफिसवर केली होती. हा विक्रम प्रभासच्याच 'सालार'ने मोडला आहे. 'सालार' जागतिक बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशीच्या कमाईमध्ये 175 कोटींचा टप्पा ओलांडण्यास तयार आहे असा अंदाज विजयबालन यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे, आणखी एक उद्योग विश्लेषक रमेश बाला यांनी 'सालार' 2023 चा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
'सालार' बॉक्स ऑफिस कलेक्शन इंडिया नेट
भारतात 'सालार' चित्रपटाने त्याच्या पहिल्या दिवशी 95 कोटी रुपयांची कमाई करून प्रभावी पदार्पण केले. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने पहिल्या दिवशी तेलुगू सिनेमांमध्ये 88 टक्के ऑक्युपन्सी रेट नोंदवला आहे. हिंदी, तेलुगू, इंग्रजी, तामिळ आणि कन्नड- पाच भाषांमध्ये रिलीज झालेल्या - दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीच्या अंदाजांसह असे सूचित करते की 'सालार'ने आता भारतात रु. 100.58 कोटी ओलांडले आहेत. अद्यापही अंतिम डेटा हाती आलेला नाही.
'सालार' विरुद्ध 'डंकी' परदेशातील लाट
परदेशी बाजारपेठेकडे वळल्यास मलेशियामध्ये, 'सालार' आणि 'डंकी' या दोन चित्रपटांनी वीकेंडच्या टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं. तर सिंगापूरमध्ये, प्रभास स्टारर 'सालार'ने आज 'एक्वामॅन' आणि 'द लॉस्ट किंगड'मला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर दावा केला आहे. उत्तर अमेरिकेत 'सालार' ख्रिसमसच्या वीकेंडसाठी टॉप 5 मध्ये सामील होत आहे. शाहरुखच्या 'डंकी' चित्रपटालाही या सणाच्या दिवसात टॉप टेनमध्ये स्थान मिळालं आहे.
'सालार'ला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी त्याच्या या अॅक्शन-पॅक ड्रामाचा स्वीकार केला आहे. 400 कोटी रुपयांच्या अंदाजित बजेटसह बनलेल्या 'सालार'ने रिलीज झाल्यावर जगभरात सुमारे 7000 स्क्रीन्स मिळवल्या. प्रभासबरोबर या चित्रपटात चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू, श्रुती हासन आणि बॉबी सिम्हा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा -
- 'कल्कि 2898' एडी ते 'पुष्पा 2' पर्यंत हे 10 साऊथ चित्रपट 2024 मध्ये होईल प्रदर्शित
- आनंद पंडितच्या बर्थ डे पार्टीत सलमानने मारली अभिषेक बच्चनला मिठी, ट्रोलर्सनी उडवली खिल्ली
- यंदाच्या ऑस्कर शर्यतीत एकही भारतीय चित्रपट नाही, '2018' च्या दिग्दर्शकाने मागितली प्रेक्षकांची माफी