Salaar Box Office Collection day 19 : साऊथ स्टार प्रभासनं एक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. 'सालार' चित्रपटानं जगभरात 700 कोटीचा व्यवसाय केला आहे. प्रभासनं अनेक दाक्षिणात्य कलाकारांना मागे टाकत हा मोठा विक्रम सर केला. प्रभास स्टारर हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रचंड कमाई करताना दिसत आहे. चित्रपट आता 700 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. याबद्दल माहिती चित्रपट तज्ञ मनोबल विजयबालन यांनी दिली आहे. याशिवाय त्यांनी प्रभासच्या एका मोठ्या अचिव्हमेंटबद्दलही सांगितलं आहे.
700 कोटी कमाईची हॅट्रीक :प्रभास हा पहिला साऊथ अभिनेता आहे, ज्याच्या 3 चित्रपटांनी 700 कोटींचा गल्ला पार केला आहे. भारतात हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्येही सामील होऊ शकलेला नाही. मात्र लकरच हा चित्रपट 500 कोटीचं लक्ष पार करेल अशी अपेक्षा केली जात आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी या चित्रपटानं 2.15 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं देशांतर्गत एकूण 397.80 कोटीची कमाई केली आहे. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वाधिक कमाई करणार्या चित्रपटांच्या टॉप 5मध्ये आला आहे. या यादीत रजनीकांतचा चित्रपट 2.0, यशचा चित्रपट 'केजीएफ चॅप्टर 2', एसएस राजामौलीचा चित्रपट 'आरआरआर' आणि 'बाहुबली 2' यांचाही समावेश आहे.