महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रिलीजच्या दहाव्या दिवशीही 'सालार'ची बॉक्स ऑफिसवर चलती, केली 'इतकी' कमाई - प्रभास

Salaar Box Office Collection Day 10: साऊथ अभिनेता प्रभास अभिनीत 'सालार' हा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. रिलीजच्या दहाव्या दिवशी या चित्रपटानं किती कमाई केली, हे जाणून घेऊ या.

Salaar Box Office Collection Day 10
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 10

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 11:41 AM IST

Salaar Box Office Collection Day 10: साऊथ सुपरस्टार प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन स्टारर 'सालार' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. 'सालार' चित्रपट मोठ्या पडद्यावर 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानं चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम मोडले आहेत. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालाय. 'सालार' बॉक्स ऑफिसवर 'डंकी' चित्रपटाला जोरदार टक्कर देताना दिसत आहे. प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारसह या चित्रपटात श्रुती हासन, जगपती बाबू, माईम गोपी, श्रिया रेड्डी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

'सालार' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, प्रभासच्या 'सालार'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 90.7 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 56.35 कोटी, तिसऱ्या दिवशी 62.05 कोटी, चौथ्या दिवशी 46.3 कोटी, पाचव्या दिवशी 24.9 कोटी, सहाव्या दिवशी 15.6 कोटी, सातव्या दिवशी 12.1 कोटी, आठव्या दिवशी 9.62 कोटी , नवव्या दिवशी 12.55 कोटी आणि दहाव्या दिवशी 14.50 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 344.67 कोटी झालं आहे. दरम्यान या चित्रपटाचा आजचा रिलीजचा अकरावा दिवस आहे. जगभरात या चित्रपटानं 600 कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट 1000 कोटी लवकरच कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'सालार'चं चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलंय. या चित्रपटामध्ये प्रभास हा अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसला आहे.

'सालार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

पहिला शुक्रवार पहिला दिवस: 90.7 कोटी

पहिला शनिवार दुसरा दिवस: 56.35 कोटी

पहिला रविवार तिसरा दिवस: 62.05 कोटी

पहिला सोमवार चौथा दिवस: 46.3 कोटी

पहिला मंगळवार पाचवा दिवस: 24.9 कोटी

पहिला बुधवार सहावा दिवस: 15.6 कोटी

पहिला गुरुवार सातवा दिवस: १२.१ कोटी

दुसरा शुक्रवार आठवा दिवस: 9.62 कोटी

दुसरा शनिवार नववा दिवस: 12.55 कोटी

दुसरा रविवार दहावा दिवस: 14.50 कोटी

एकूण कमाई: 344.67 कोटी रुपये

हेही वाचा :

  1. शाहरुख खान स्टारर 'डंकी'नं बॉक्स ऑफिसवर केला धमाका
  2. अक्षय कुमारनं पीएम मोदींच्या 'मन की बात'मध्ये दिला फिटनेस मंत्र
  3. अमिताभ बच्चन यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी केबीसीच्या सेटला दिला अखेरचा निरोप

ABOUT THE AUTHOR

...view details