मुंबई - 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री काजोलचा आगामी चित्रपट 'सलाम वेंकी' चा ट्रेलर बालदिनाच्या निमित्ताने सोमवारी (14 नोव्हेंबर) रिलीज झाला आहे. काजोल या चित्रपटात एका धाडसी महिलेची भूमिका साकारत आहे, जी आपल्या मुलाच्या जीवघेण्या आजारासमोर भिंतीसारखी उभी आहे. चित्रपटाचा ट्रेलर भावनिक आणि जीवनाचे मार्मिक धडे शिकवणारा आहे. या चित्रपटाद्वारे काजोलने पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री करण्याची तयारी केली आहे.
कसा आहे चित्रपटाचा ट्रेलर?- 'सलाम वेंकी'चा 2.17 मिनिटांचा हा ट्रेलर आई आणि मुलीच्या कथेवर आधारित आहे. एक धाडसी आईच्या भूमिकेत काजोल तिच्या मुलाचे आयुष्य नव्याने बनवण्याच्या प्रक्रियेत आहे. काजोलचा मुलगा एका जीवघेण्या आजाराने त्रस्त आहे, त्याची काळजी घेण्यासाठी काजोल रात्रंदिवस मेहनत करत आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट एका आईचा मुलांसाठी केलेला संघर्ष दर्शवतो.