मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी आता चित्रपट क्षेत्रात आपले भविष्य आजमावत आहेत. या जोडीने आपल्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट 'एलजीएम' ( Lets get married) चा ट्रेलर लॉन्च केला. साक्षीने चित्रपटाच्या प्रमोशनची योजना आखली आहे. चित्रपट लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. अलिकडे झालेल्या एका मुलाखतीत साक्षीने चित्रपटातील कलाकारांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. साक्षीला बॉलिवूडपेक्षाही साऊथ स्टार्सचे जास्त आकर्षण वाटते. विशेष म्हणजे तिचा सर्वात स्टाइलिश स्टार अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर अल्लु अर्जुन आहे.
धोनीची पत्नी निघाली अल्लु अर्जुनची फॅन -महेंद्र सिंग धोनीची पत्नी साक्षी ४१ वर्षिय अल्लु अर्जुनची डाय हार्ड फॅन आहे. तिने अल्लुचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. तिला पुष्पा स्टार अल्लुच्या अभिनयात दम असल्याचे साक्षीला वाटते. साक्षीने हेही सांगितले की तिने अल्लु अर्जुनचे डब झालेले सर्व चित्रपट पाहिले आहेत. अलिकडेच रिलीज झालेला 'पुष्पा' चित्रपट तिचा सर्वाधिक आवडलेला चित्रपट असल्याचे साक्षीने सांगितले. या चित्रपटाने सर्वाधिक इम्प्रेस केल्याचे ती म्हणाली. या चित्रपटाती अल्लुच्या अभिनयाची तारीफ तिने केली.
साक्षी धोनीला आहे पुष्पा २ ची प्रतीक्षा- अल्लु अर्जुनच्या करोडो चाहत्यांप्रमाणेच साक्षी धोनीही पुष्पा २ ची आतुरतेने वाट पाहात आहे. अलिकडेच 'पुष्पा २' चित्रपटातील एक डायलॉग अल्लु अर्जुनकडून नकळतपणे लीक झाला. या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांना वेडे केले आहे. लवकरच या चित्रपटाच्या नव्या अपडेटची चाहत्यांप्रमाणेच साक्षीलाही प्रतीक्षा लागून राहिली आहे.
साक्षी धोनी निर्माण करत असलेला चित्रपट 'एलजीएम' ४ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता हरिष कल्याण, नादिया, इव्हाना, योगी बाबू आणि आरजे विजय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. साक्षी सिंग धोनी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश थामिलामणी यांनी केले आहे.