मुंबई - 'फाडू- अ लव्ह स्टोरी' या आगामी ओटीटीवरील स्ट्रीमिंग मालिकेत अभिनेत्री सैयामी खेरने मराठी मुलीची भूमिका साकराली आहे. या भूमिकेतून ती पुन्हा एकदा आपल्या मूळ महाराष्ट्रीयन व्यक्तीरेखेला न्याय देणार आहे. सैयामी ही मराठी भाषिक कुटुंबातील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे.
अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित, 'फाडू- अ लव्ह स्टोरी' ही नवी वेब मालिका आधुनिक जीवनातील आव्हाने आणि गोंधळांवर आधारित आहे. याबद्दल बोलताना, अभिनेत्री म्हणाली: "मला आठवतं की अश्विनी मॅडम (अश्विनी अय्यर तिवारी, दिग्दर्शक) यांनी माझ्या ऑडिशन्स पाहिल्यानंतर, आमची पहिली मीटिंग झूमवर होती, तेव्हा मी माझ्या शेतात बसले होते. अश्विनी मॅडमने हे सांगितलेकी ही तीच मंजीरी आहे. मंजरी नेमकी कोण आहे ते मला तुझ्यात दिसत आहे. 'फाडू' मधील माझी व्यक्तिरेखा निसर्गाच्या कुशीत वाढलेली, प्रत्येक गोष्टीत कविता शोधणारी आहे. खऱ्या आयुष्यात मी कोण आहे, याच्या अगदी जवळ आहे. मी एका महाराष्ट्रीयनची भूमिका केली आहे. आणि मराठी ही माझी मातृभाषा असल्यामुळे, माझ्या पात्रात रस भरणे इतके अवघड नव्हते."