महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Saif Ali Khan : सैफ अली खानच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस, काय आहे कारण? - मुंबई पोलीस

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शुक्रवारी सैफच्या घराबाहेर मुंबई पोलिसांची गाडी दिसली. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांना चिंता वाटू लागली आहे की, सैफच्या घरी पोलीस का पोहोचले?

Saif Ali Khan
Saif Ali Khan

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 10:25 PM IST

Updated : Oct 27, 2023, 10:58 PM IST

मुंबई Saif Ali Khan :अभिनेतासैफ अली खान कोणत्या ना कोणत्या कारणानं सतत चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी तो त्याच्या दोन मुलांसोबत स्पॉट झाला होता. तो आपल्या मुलांसोबत कधी स्पोर्ट्स क्लबमध्ये तर कधी घराबाहेर दिसतो. पण आज एका व्हिडिओनं सैफच्या चाहत्यांची चिंता वाढवली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये मुंबई पोलिसांची कार सैफ अली खानच्या घराबाहेर उभी असलेली दिसत आहे. या व्हिडीओनंतर मुंबई पोलीस सैफच्या घरी का पोहोचले, हा प्रश्न सर्वांनाच पडला.

पापाराझीनं शेअर केला व्हिडिओ : एका पापाराझीनं सैफ अली खानच्या घराबाहेरील एक क्लिप शेअर केली. या क्लिपमध्ये अभिनेत्याच्या घराबाहेर मुंबई पोलिसांची गाडी उभी असलेली स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. मुंबई पोलीस सैफच्या घरी काय करण्यासाठी पोहोचले होते, हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

हे आहे कारण : तुमच्या या आतुरतेला पूर्णविराम देत आम्ही तुम्हाला सांगतो की, मुंबई पोलीस कोणतीही केस किंवा चौकशीच्या संदर्भात सैफ अली खानच्या घरी पोहोचले नव्हते. पोलीस सैफला एका कार्यक्रमाला बोलावण्यासाठी आले होते. उमंग सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सैफ अली खानला आमंत्रित करण्यासाठी मुंबई पोलीस त्याच्या घरी पोहोचले होते.

सैफ अली खानचं वर्कफ्रंट :बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, तो शेवटचा प्रभास स्टारर पौराणिक चित्रपट 'आदिपुरुष' मध्ये दिसला होता. यामध्ये त्यानं रावणाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात क्रिती सेनन, सनी सिंग आणि देवदत्त नागे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.

हेही वाचा :

  1. Tiger 3 towel fight scene : हॉलिवूड स्टार मिशेलनं सांगितला कतरिनासोबतच्या टॉवेल फाईट सीन्सचा अनुभव
  2. Weekend Ka Vaar: सलमाननं विकी जैनचा पर्दाफाश केल्यानं अंकिताच्या डोळ्यात पाणी, मन्नारामुळे अभिषेकनं खाल्ले टोमणे
  3. Allu Arjun wish for David Warner : अल्लु अर्जुननं डेव्हिड वॉर्नरला दिल्या 'पुष्पा' स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा
Last Updated : Oct 27, 2023, 10:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details