मुंबई - ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात साऊथचा अभिनेता प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत दिसत आहे. क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला या चित्रपटात रावणाची महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. रिलीज झालेल्या चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रभास आणि क्रिती सेनॉनची जोडी पाहून चाहते खूप खूश आहेत. त्याचवेळी सैफ अली खानला रावणाच्या भूमिकेत पाहिल्यानंतर यूजर्स संतापले आहेत. रावणाच्या भूमिकेतील सैफचे वर्णन युजर्स मुघल शासक म्हणून करत आहेत.
खिलजी जास्त दिसतोय- सैफ अली खान आणि त्याच्या पुष्पक विमानापर्यंत सगळ्यांनाच ट्रोल केले जात आहे. सैफला पाहून ट्रोल्स म्हणत आहेत की, अभिनेता रावण कमी आणि अलाउद्दीन खिलजी अधिक दिसतो.
रावण की रिझवान? त्याचवेळी काही युजर्सनी सैफचा रावणाच्या भूमिकेतला लूक पाहून आश्चर्यचकित केले आहे. लूकबद्दल बोलताना, सैफ अली खानला स्पाइक हेअरस्टाईल, लांब दाढी, डोळ्यात मस्करा घातलेला पाहून एका यूजरने लिहिले, ''खरंच? रावणाचे नाव बदलून रिजवान ठेवण्यात आले आहे का? अशा दाढीला कोण स्टाईल देतो? जावेद हबीब? त्याने सैफ अली खानला अलाउद्दीन खिलजी बनवले आहे.''
एका यूजरच्या मते, सैफ अली खानने रावणाला मुघल स्टाईल देण्याची कल्पना दिली असावी. सैफचा लूक पाहिल्यानंतर युजरने लिहिले, 'हा विनोद आहे का? हे पूर्णपणे निराशाजनक आहे'.