हैदराबाद - साउथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई पल्लवीच्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीने 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटात दाखविलेल्या काश्मिरी पंडितांच्या पलायनाची तुलना एका घटनेशी केली आहे. त्यानंतर अभिनेत्रीच्या विरोधात जोरदार टीका होत आहे. सईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे. कोट्यवधी रुपयांच्या ब्युटी प्रोडक्टची जाहिरात नाकारणाऱ्या या अभिनेत्रीनंतर काय म्हटलंय जाणून घेऊया...
सई पल्लवीने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात त्यावेळी काश्मिरी पंडितांना कसे मारले गेले हे पाहिले आहे. जर तुम्ही या प्रकरणाकडे धार्मिक संघर्ष म्हणून पाहत असाल, तर नुकतीच एक घटना घडली होती, ज्यामध्ये गाय घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम चालकाला मारहाण करून जबरदस्तीने 'जय श्री राम'ची घोषणा देण्यासाठी भाग पाडले होते. त्यामुळे या दोन घटनांमध्ये काय फरक आहे'.
त्याचबरोबर सोशल मीडियावर सई पल्लवीच्या वक्तव्यावर यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही युजर्सनी तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे, तर काहींनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे.