मुंबई - Ramayana : रणबीर कपूर आणि साई पल्लवी 2024 च्या सुरुवातीला 'रामायणा' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. या चित्रपटामध्ये साई पल्लवी ही माता सीतेची भूमिका साकारणार आहे. याशिवाय केजीएफ (KGF) स्टार यशची देखील महत्त्वाची भूमिका 'रामायणा'मध्ये असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाबद्दल खूप चर्चा सुरू होत्या. याआधी 'रामायणा' चित्रपटामध्ये आलिया भट्ट माता सीतेच्या भूमिकेत दिसणार होती, मात्र व्यस्त शेडूलमुळे तिला या चित्रपटामधून बाहेर पडावे लागले. दरम्यान आता या भूमिकेसाठी निर्मात्यांनी साई पल्लवीला कास्ट केले आहे. याशिवाय निर्मात्यांनी रावणाच्या भूमिकेसाठी साऊथ सुपरस्टार यशला निवडलं आहे.
'रामायण'मध्ये साई पल्लवी दिसेल मुख्य भूमिकेत :'रामायणा'मध्ये रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. नितेश तिवारी या चित्रपटाचे दोन पार्ट बनवणार आहे. पहिल्या भागात रणबीर कपूर (राम) आणि (सीता) साई पल्लवी विषयी दाखविल्या जाणार आहे. याशिवाय दुसऱ्या भागात यश रावणाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसेल. रणबीर कपूर आणि साई पल्लवी 2024 च्या सुरुवातीला 'रामायणा' पार्ट 1 चे शूटिंग सुरू करणार आहे, तर यश पुढील वर्षी जुलैपासून शूटिंग करणार असल्याचं समजत आहे. या तिन्ही कलाकारांनी या चित्रपटासाठी त्यांची लूक टेस्ट दिली आहे. या चित्रपटाची निर्मिती मधु मंटेना यांनी केली असून नितीश तिवारी दिग्दर्शित करणार आहेत.