मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री क्रिसन परेरा यूएईमधील शारजाह तुरुंगातून सुटका करून भारतात परतली आहे. क्रिसन परेराला १ एप्रिल रोजी ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. दरम्यान आता क्रिसन शारजाहून मुंबईत परतली आहे. ती मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे तिने सांगितले आहे. महेश भट्ट दिग्दर्शित बॉलीवूड चित्रपट 'सडक २'मध्ये काम करणारा क्रिसनला, १ एप्रिल रोजी शारजाह विमानतळावर ड्रग्ज सापडल्याने पकडण्यात आले होते. पुरस्काराच्या ट्रॉफीमध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी तिला शारजा पोलिसांनी त्यावेळी अटक केली होती.
ड्रग्ज प्रकरण : क्रिसन परेरा मुंबईत परतल्यावर तिचा भाऊ केविन परेराने आनंद व्यक्त केला आणि सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'क्रिसन अखेर परत आली आणि आम्हाला भेटली, मला माहित होते की ती परत येईल मी जूनमध्ये सांगितले होते, पण यास थोडा वेळ लागला आणि शेवटी परत आली. एप्रिलमध्ये मुंबई क्राईम ब्रँचने क्रिशन परेराला ड्रग्ज तस्करी प्रकरणात फसवल्याप्रकरणी बेकरी मालक अँथनी पॉल (वय ३५ वर्षे) आणि त्याचा बँकर पार्टनर राजेश बोभाटे (३४ वर्षे) या दोघांना अटक केली होती. या दोघांनी ट्रॉफीमध्ये ड्रग्ज लपवून ठेवल्याचे चौकशीत सांगितले. क्रिसन परेरा नकळत जाळ्यात अडकली, असे त्यांनी कबूल केले.