महाराष्ट्र

maharashtra

The Archies gang : सुहाना खान आणि अगस्त्य नंदासह द आर्चिस टीम नेटफ्लिक्स इव्हेंटसाठी ब्राझीलला रवाना

By

Published : Jun 13, 2023, 3:37 PM IST

कथित लव्हबर्ड्स सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांच्यासह द आर्चीज चित्रपटाची टीम ब्राझीलला रवाना झाली आहे. 17 जून रोजी प्रसारित होणाऱ्या नेटफ्लिक्सवरील TUDUM 2023 कार्यक्रमात हे कलाकार सहभागी होतील. मुंबई विमानतळावर या टीमने पापाराझींसाठी फोटोंना पोझही दिल्या.

The Archies gang
द आर्चीज चित्रपटाची टीम ब्राझीलला रवाना

मुंबई- द आर्चीजची टीम 17 जून रोजी नेटफ्लिक्सवरील TUDUM 2023 कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ब्राझीलला रवाना झाली. सोमवारी कथित जोडपे सुहाना खान आणि अगस्त्य नंदा, द आर्चीजच्या सहकलाकार खुशी कपूर, आदिती सैगल, वेदांग रैना, मिहिर आहुजा आणि युवराज मेंडा यांच्यासोबत मुंबई विमानतळावर दिसले. त्या सर्वांनी नेटफ्लिक्स आणि द आर्चीजचा लोगो असलेले ब्लॅक जॅकेट परिधान केले होते.

द आर्चीज छापलेले मॅचिंग काळे जॅकेट - सुहाना खान, खुशी, अगस्त्य आणि त्यांच्या सहकलाकारांनी मुंबई विमानतळावर स्लीव्हवर आणि गळ्यावर पांढरे आणि पिवळे पट्टे असलेले आणि पाठीवर द आर्चीज छापलेले मॅचिंग काळे जॅकेट परिधान केले होते. खुशीने ब्लॅक क्रॉप टॉप आणि बेज ट्राउझर्स घातले होते, तर सुहानाने ब्लॅक टॉप आणि जॅकेटसह ब्लॅक ट्राउझर्स निवडले. फॅन पेजेस आणि पापाराझी अकाऊंट्सवर पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये हे सर्व कलाकार कॅमेर्‍यासमोर पोज देताना आणि त्यांच्या मॅचिंग जॅकेटची पाठ दाखवताना हसताना दिसत आहेत.

द आर्चीजचे नवीन पोस्टर- चित्रपट निर्मात्या झोया अख्तरने इंस्टाग्रामवर द आर्चीजचे नवीन पोस्टर शेअर करून नेटफ्लिक्स चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची प्रेक्षकांना माहिती दिली आहे. या पोस्टरमध्ये सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा सोबत स्टायलिश हेअरडोस आणि रेट्रो आउटफिट्समध्ये आर्चीज टीमसह आहेत. सुहाना खानने इन्स्टाग्रामवर हे पोस्टर शेअर केले असून त्यात लिहिले आहे, 'मीट द आर्चीज गँग! लवकरच येत आहे, फक्त नेटफ्लिक्सवर.

आर्ची कॉमिक्सचे भारतीय रूपांतर -झोया अख्तरने तिच्या द आर्चीज चित्रपटासह आर्ची कॉमिक्सचे भारतीय रूपांतर दिग्दर्शित केले आहे. चित्रपटाचा टीझर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता, यामध्ये कलाकारांची ओळख करून देण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या नेटफ्लिक्स TUDUM कार्यक्रमासाठी आर्चीज गँग ब्राझीलला रवाना झाली. हा कार्यक्रम ब्राझीलमध्ये होणार असून 17 जून रोजी थेट प्रसारित केला जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details