मुंबई - Rubina dilaik share pics :छोटी बहु फेम अभिनेत्री रुबीना दिलैक तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. सध्या ती पूर्णपणे आपल्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. रुबीना अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील सुट्टी घालवून अलिकडंच मुंबईला परतली आहे. तिनं या सुट्टीला बेबीमून म्हटलं आहे. रुबीनाला अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखलं जातं. अनेकदा ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत अनेक फोटो शेअर करत असते. दरम्यान, आता तिनं काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बोल्ड आउटफिटमध्ये दिसत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज काहीजणांना खूप आवडला असला तरी काहीजणांनी तिला फोटोसाठी ट्रोल आहे.
रुबीना दिलैकनं शेअर केले फोटो: रुबीना दिलैकनं आपल्या गर्भधारणेचा खुलासा यापूर्वी केला नव्हता. ती जेव्हा अमेरिकेला पती अभिनव शुक्लासोबत गेली होती, त्यावेळी तिनं काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तिच्या गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं होतं. आता पुन्हा एकदा ती फोटो शेअर केलेल्यामुळे चर्चेत आली आहे. या फोटोमध्ये तिनं डीप नेकलाइनचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. तसेच ती गुलाबी कारवर बसून फोटोसाठी पोझ देत आहे. या फोटोची थीम बार्बीची आहे. तिनं तिच्या लूकला आणखी खास बनविण्यासाठी काउबॉय बूट घातले आहेत. त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये ती कारमध्ये बसून पोझ देत आहे. या फोटोंमध्ये ती खूप खास दिसत आहे.