मुंबई -Rubina Dilaik Twin Baby Girl: टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक आणि अभिनेता अभिनव शुक्ला हे जुळ्या मुलींचे आई-वडील झाले आहेत. ही आनंदाची बातमी समजताच चाहत्यांनी सोशल मीडियावर या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या जोडप्यानं त्यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. रुबिना आणि अभिनव आई-वडील झाल्याचा खुलासा अभिनेत्रीच्या जिम ट्रेनरनं केला होता. रुबिना दिलैकनं आई झाल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर वाऱ्याप्रमाणे पसरलं आहे. आता याबद्दल अनेक चर्चा होत असल्याचं सोशल मीडियावर दिसून येत आहेत. 16 डिसेंबर 2023 रोजी रुबीनाच्या फॅन पेजनं एक पोस्ट शेअर केली होती.
रुबिना दिलैकनं दिला जुळ्या मुलींना जन्म :या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, रुबिना जुळ्या मुलींची आई झाली असल्याचं तिच्या जिम ट्रेनरनं खुलासा केला आहे. या फॅन पेजनं इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करताच लोकांमध्ये खळबळ उडाली. रुबिना आणि अभिनव यांनी अद्याप त्यांच्या जुळ्या मुलांच्या आगमनाची घोषणा केलेली नाही. रुबीनाच्या जिम ट्रेनरनं आता ही पोस्ट डिलीट केली आहे. रुबिना प्रेग्नेंसीच्या काळात सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. सप्टेंबरमध्ये तिच्या गर्भधारणेची पुष्टी केल्यानंतर, तिनं नोव्हेंबरमध्ये खुलासा केला होता की ती जुळ्या मुलांची आई होणार आहे. गरोदरपणात होणाऱ्या बदलांसोबतच तिनं तिच्या बेबी बंपचा खुलासा सोशल मीडियावर अनेकदा केला आहे.