मुंबई: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार राम चरण हा सध्या यशाचा शिखरावर आहे. अभिनेत्याच्या शेवटच्या रिलीज झालेल्या 'आरआरआर' चित्रपटाचे यश हे जगभर गाजले. 'आरआरआर' हा चित्रपट ऑस्कर विजेता ठरला. तसेच जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1100 कोटींपेक्षा जास्त कमाई केला आहे. आता या चित्रपटाद्वारे राम चरण आंतरराष्ट्रीय स्टार बनले आहेत. आता तो हॉलिवूडमध्ये प्रवेश करणार असे दिसत आहे. कारण श्रीनगरमध्ये झालेल्या जी 20 (G20) शिखर परिषदेत राम चरण हा सहभागी झाला होता. चित्रपटांवर या ठिकाणी चर्चा झाली. दरम्यान, यावेळी अभिनेत्याने त्याच्या हॉलिवूड पदार्पणाबद्दल चाहत्यांना एक हिंट दिली आहे.
हॉलीवूडमध्ये झळणार राम चरण : राम चरम हे जी 20 ( G20) शिखर परिषदेत भारतीय चित्रपटसृष्टीतील उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. तसेच यावेळी त्याने चाहत्यांना हॉलीवूडमधून ऑफर मिळण्याबद्दल एक मोठा इशारा दिला आहे. तो म्हणाला, 'मला माझा भारत देशाला जगभर प्रसिद्ध करायचा आहे, हे फक्त हॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शकाच्या मदतीने शक्य होईल, मला माझी संस्कृती सोडायची नाही, आपली संस्कृती आणि भारतीय भावना फार मजबूत आहेत. आमच्या कथांमध्ये प्रतिष्ठा आहे, ती केवळ दक्षिणेतील चित्रपटसृष्टीचीच नाही तर संपूर्ण चित्रपटसृष्टीची आहे.