महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

RRR Director Rajamouli : एसएस राजामौली तामिळनाडूच्या थुथुकुडीमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसले - कौटुंबिक सुट्टीचा आनंद घेत असतानाचे फोटो व्हायरल

आरआरआर दिग्दर्शक राजामौली तामिळनाडूच्या थुथुकुडीमध्ये कुटुंबासह सुट्टी घालवताना दिसले. सोशल मीडियावर सध्याला त्यांची कौटुंबिक सुट्टीचा आनंद घेत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

SS Rajamouli
एसएस राजामौली

By

Published : Jun 27, 2023, 5:16 PM IST

मुंबई : चित्रपट निर्माते एसएस राजामौली सध्याला चर्चेत आले आहे. राजामौली हे गजबजलेल्या जगापासून दूर कौटुंबिक सुट्टीचा आनंद घेत आहेत. दिग्दर्शक गेल्या वर्षभरापासून अ‍ॅक्शन ड्रामा आरआरआरसाठी अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये उपस्थित राहण्यासाठी जगभरात प्रवास करण्यात व्यस्त होते. दरम्यान, राजामौलीने शेवटी स्वत:साठी थोडा वेळ काढून कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याचा निर्णय घेतला.

RRR Director Rajamouli
RRR Director Rajamouli

राजामौली तामिळनाडूच्या थुथुकुडी गावी : राजामौली यांनी तामिळनाडूच्या थुथुकुडी येथे त्यांची पत्नी रमा, त्यांचा मुलगा एसएस कार्तिकेय आणि त्यांची पत्नी पूजा, त्यांची मुलगी मयुखा यांच्यासोबत रिसॉर्टमध्ये चांगला वेळ घालवत आहे . या पाहुण्यांचे आयोजन केल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, या रिसॉर्टने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर राजामौली आणि त्यांच्या कुटुंबाची विविध आकर्षक क्रियामध्ये भाग घेत असलेली काही फोटो शेअर केली आहे. राजामौली यांनी त्यांच्या भेटीची आठवण म्हणून रिसॉर्टच्या आवारात काही झाडेही लावली.

RRR Director Rajamouli

राजमौली यांनी काही झाडेही लावली : रिसॉर्टमधील एका चाहत्याने राजामौली आणि त्यांच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर करत लिहले, 'एसएस राजामौली सर आणि रमा काकूला या शनिवार आणि रविवार एक्वा आउटबॅक होस्ट करण्याचा पूर्ण सन्मान मिळाला. अर्जुनमोथा आणि मी नम्र आहोत. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद आणि एसएस कार्तिकेय अण्णा आणि एसएस पूजा प्रसाद लवकरच भेटू अशी आशा आहे.' असे या चाहत्याने लिहले आहे. या व्यक्तीने राजामौलीची पत्नी रमा यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला. या व्यक्तीने राजामौली यांच्या पत्नी आणि रमाबद्दल बोलताना लिहले, 'रमा काकूंना जाणून घेतल्याने मला माझ्या काकूंपैकी एक घरातील काकू असल्यासारख्या वाटल्या, आणि ते मौल्यवान आहे.'

वर्कफ्रंट: एसएस राजामौली यांच्या वर्क फ्रंटवर बोलायचे झाले तर, ते लवकरच सुपरस्टार महेश बाबू यांच्यासोबत त्याच्या आगामी, अद्याप नाव नसलेल्या प्रोजेक्टसह दिग्दर्शकाच्या खुर्चीवर परतणार आहेत. गेल्या वर्षी आयोजित टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) मध्ये, राजामौली यांनी एका प्रश्नोत्तर सत्रादरम्यान खुलासा केला की हा चित्रपट 'ग्लोबट्रोटिंग अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर फिल्म' असेल.

हेही वाचा :

  1. Satyaprem Ki Katha day 1: सत्यप्रेम की कथाची पहिल्या दिवशीचा कमाई अंदाज आणि स्क्रीन संख्या जाणून घ्या
  2. Sonnalli seygall : 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सहेगलने सोशल मीडियावर शेअर केले हनिमूनचे फोटो
  3. Neena Gupta first on screen kiss: नीना गुप्ताने सांगितला पहिल्या ऑनस्क्रीन चुंबनाचा थरारक अनुभव, वाचा सीननंतर काय घडले

ABOUT THE AUTHOR

...view details