मुंबई - बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये हुकमी यश मिळवणाऱ्या निर्माता दिग्दर्शकांमध्ये राहित शेट्टीचा समावेश होतो. त्याने आजवर गोलमाल फ्रँचाइज आणि 'सिंघम', 'सिम्बा' यासारख्या कॉप मुव्हीज यशस्वीरित्या बनवल्या आहेत. मात्र अलिकडे त्याने बनवलेला 'सर्कस' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला. हा चित्रपट विल्यम शेक्सपिअरच्या 'द कॉमेडी ऑफ एरर्स' या नाटकावर आधारित होता.
'सर्कस' चित्रपटात रणवीर सिंग, वरुण शर्मा, पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिस या कालाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. २०२२ च्या डिसेंबरमध्ये रिलीज झालेला हा चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ का फिरवली याबद्दल बोलताना रोहित शेट्टी म्हणाला की, 'प्रमाणिकपणे सांगयाचे तर हे माझ्यासाठी चकित करणारे होते. पण तुम्हाला नेमके कुठे चुकले यावर आत्मचिंतन केले पाहिजे आणि जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्ही यावर काम करा आणि पुढे गेले पाहिजे.'
बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला सर्कस हा काही पहिला सिनेमा नाही आणि रोहित शेट्टीने सांगितले की त्याच्याकडे वास्तववादी दृष्टीकोन असल्यामुळे हा काही त्याचा अखेरचा सिनेमा नाही. 'माझा 'जमीन' हा पहिला चित्रपट फारशी चांगली कामगिरी करु शकला नव्हता, 'संडे' अपयशी ठरला होता आणि 'दिलवाले' चित्रपटही चांगला चालला नव्हता. आता हे चौथ्यांदा घडलंय. २५ ते ३० चित्रपट बनवण्याचे माझे लक्ष्य असून यातील आणखी तीन चार चित्रपट 'सर्कस'सारखे बनू शकतात.', असे रोहित पुढे म्हणाला.
रोहित शर्माला बॉलिवूडमध्ये २० वर्षे पूर्ण झाली आहेत. याकाळात त्याला प्रेक्षकांनी स्वीकारल्याबद्दल त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 'हा एक अद्भूत असा प्रवास होता. मी जेव्हा माझा पहिला सिनेमा 'जमीन' किंवा 'गोलमाल' हा दुसरा सिनेमा सुरू केला तेव्हा मी इथपर्यंत पोहोचू शकेन अथवा माझे चित्रपट ब्रँड बनतील, असा विचारही केला नव्हता', असे तो म्हणाला.
'या देशात कॉप युनिव्हर्स मी पहिल्यांदा सुरू करणारा असेन, असे मला कधीही वाटले नव्हते. 'खतरों की खिलाडी' सारखा टीव्ही शो मी होस्ट करु शकेन असे कधीही वाटले नव्हते. माझे मन, शक्ती आणि जिव्हाळा मी जे काही केले त्यासाठी पणाला लावला. या २० वर्षाच्या पुढे काय करता येईल हे मी पाहात आहे', असे तो म्हणाला.