मुंबई - Rohit Shetty confirms Golmaal 5 : हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या पहिल्या ओटीटी वेब सीरीज 'इंडियन पोलिस फोर्स'मुळे चर्चेत आहे. या वेब सीरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी, श्वेता तिवारी, ईशा तलवार, शरद केळकर, मुकेश ऋषी आणि निकेतन धीर हे कलाकार दिसणार आहेत. रोहित शेट्टीची 'इंडियन पोलिस फोर्स' ही वेब सीरीज 19 जानेवारीला अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होत आहे. दरम्यान रोहित शेट्टी आणि 'इंडियन पोलिस फोर्स'मधील संपूर्ण स्टार कास्ट या वेब सीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान, एका मुलाखतीत रोहित शेट्टीनं त्याच्या कॉमेडी फ्रँचायझी 'गोलमाल'च्या पाचव्या पार्टबद्दल खुलासा केला आहे.
प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी 'गोलमाल 5' येणार : रोहित शेट्टी त्याच्या आगामी 'इंडियन पोलिस फोर्स' वेब सीरीजबद्दल बोलत असताना त्याला 'गोलमाल 5' चित्रपटाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यानं म्हटलं की, ''गोलमाल 5 येईल, परंतु बराच काळ प्रतीक्षा करावी लागेल. मला वाटते येत्या दोन वर्षांत 'गोलमाल 5' प्रेक्षकांमध्ये येईल, 'गोलमाल 5'ची यावेळी मनोरंजनाची पातळी आधीच्या सर्व गोलमालपेक्षा चांगली असेल.' यानंतर रोहित शेट्टीनं पुढं सांगितलं, 'आज सिनेमाचा दृष्टीकोन आणि युग बदलले आहे, यानुसार 'गोलमाल 5' बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. ही एक कॉमेडी फ्रँचायझी आहे, मला प्रेक्षकांची फसवणूक करायची नाही.''