मुंबई : बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आणि आलिया भट्ट त्यांच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला फक्त तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे सध्या रणवीर आणि आलिया चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची स्टारकास्ट रणवीर आणि आलिया चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये जात आहेत. मुंबई, अहमदाबाद, कानपूर आणि बरेलीनंतर आता करणचे रॉकी आणि राणी कोलकात्यामध्ये पोहोचले आहेत. रणवीर आणि आलिया 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातील 'धिंडोरा बाजे रे' हे गाणे कोलकातामध्ये रिलीज करणार आहेत. दरम्यान चाहते 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातील या गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
रॉकी आणि राणी ब्लॅक लूकमध्ये दिसत आहेत :रणवीर सिंग आणि आलिया भट्ट २४ जुलै २०२३ रोजी पहाटे कोलकात्याला निघताना मुंबई विमानतळावर दिसले. रणवीर आणि आलिया दोघेही ऑल ब्लॅक लूकमध्ये डॅशिंग दिसत होते. रणवीरने काळ्या रंगाच्या टी-शर्टवर लांब जॅकेटसह काळी पँट आणि पायात लाल रंगाची चप्पल घातली होती. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी त्याने सनग्लास आणि फेस मास्कसह गळ्यात चांदीची चेन घातली होती. दुसरीकडे आलियाने बॅगी जीन्सवर टँक टॉप आणि काळ्या रंगाचे शर्ट परिधान केले होते. याशिवाय तिने यावर काळा रंगाचा चष्मा आणि पायात चप्पल घातली होती. आलिया तिच्या नो-मेकअप लूकमध्ये डॅशिंग दिसत होती.